मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री शांता तांबे काळाच्या पडद्याआड !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २० जून २०२३ ।  अभिनय क्षेत्रात मराठी चित्रपटसृष्टीत आपली विशेष ओळख निर्माण करणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री शांता तांबे यांचे सोमवारी १९ जून रोजी निधन झाले. वयाच्या 90 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. शांता तांबे यांनी त्यांच्या अभिनयानं मराठी चित्रपटसृष्टीत विशेष ओळख निर्माण केली होती. त्यांनी सुरूवातीला नाटकात काम करून अभिनयक्षेत्रात पदार्पण केले होते. त्यांच्या निधनाने मराठी चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे.

भालजी पेंढारकर , दिनकर पाटील, अनंत माने यांच्यासह अनेक दिग्गज दिग्दर्शकांसोबत शांता तांबे यांनी काम केले. मोहित्यांची मंजुळा , सवाल माझा ऐका , मोलकरीण, बाई मोठी भाग्याची, मर्दानी अशा चित्रपटांमधून त्या प्रेक्षकांच्या भेटीस आल्या. घरची परिस्थिती प्रतिकूल असल्याने चित्रपटांमध्ये काम करण्याचे ठरवले होते, असे त्यांनी अनेक मुलाखतींमध्ये सांगितले होते. दोन बायका फजिती ऐका, चांडाळ चौकडी, असला नवरा नको गं बाई, सोंगाड्या, चंदनाची चोळी या चित्रपटांमध्ये देखील त्यांनी काम केले आहे.

सध्याच्या चित्रपटांबाबत शांता तांबे म्हणाल्या होत्या की, आताचे सर्व चित्रपट कॉमिक आहेत. ते चित्रपट सर्व चांगले आहे. त्याकाळातील कथानक वेगळे आताचे वेगळे आहेत. दिग्दर्शकही वेगळे असतात. त्यांचे काम देखील वेगळे असते. आम्हाला त्या काळी चांगले दिग्दर्शक मिळेल. त्यामुळे मला अभिनय देखील चांगला करता आला, असे प्रतिपादन शांता तांबे यांनी एका मुलाखतीत केले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम