“या” तारखेला आदित्य ठाकरे अयोध्या दौऱ्यावर

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । ०६ जून २०२२ । शिवसेना नेते तथा पर्यटनमंत्री आदित्य उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याची तारीख अखेर ठरली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज श्रीकांत ठाकरे यांचा अयोध्या दौरा रद्द झाला आहे. मात्र, आदित्य उद्धव ठाकरे हे शिवसैनिकां सोबत अयोध्येत पोहचणार आहेत. मशिदीवरील भोंगे आणि श्री हनुमान चालिसा पठण या काही मुद्य्यांनंतर शिवसेना आणि मनसेमध्ये एकप्रकारे हिंदुत्वावरून रस्सीखेच सुरू झाल्याचे दिसून आले. याच दरम्यान, आदित्य उद्धव ठाकरे आणि राज श्रीकांत ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याची घोषणा करण्यात आली होती. सुरुवातीस आदित्य उद्धव ठाकरेंचा दौरा १० जून रोजी ठरला होता. परंतु, तारखेत काही बदल होऊन आता सदर दौऱ्याची तारीख १५ जून झाली आहे.

जय श्रीराम…१५ जून चलो अयोध्या… श्री आदित्य ठाकरे जी शेकडो शिवसैनिकों क साथ अयोध्या आयेंगे.. रमलल्ला के दर्शन करेंगे…” असे खा. संजय राऊत यांनी ट्वीट केले आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम