कृषी व माजी सैनिक कल्याण मंत्री मा. ना. श्री. दादाजी भुसे साहेब, यांच्या हस्ते विविध कृषी विभागाच्या योजनांचा शुभारंभ

बातमी शेअर करा...

अमळनेर (प्रतिनिधी ) कृषि व माजी सैनिक कल्याण मंत्री महाराष्ट्र राज्य यांनी अमळनेर तालुक्यातील खरिप हंगाम पूर्व तयारी बाबत दौरावेळी कृषि विभागाच्या विविध योजनाचा शुभारंभ केला. महाराष्ट्र शासन कृषी विभाग व राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बॅक (नाबार्ड) व राष्ट्रविकास अॅग्रो एज्युकेशन संस्था अमळनेर जळगाव संस्थेचे वतीने स्थापन केलेली माळण परिसर शेतकरी उत्पादक कंपनी रणाईचे ता. अमळनेर जि. जळगाव या शेतकरी कंपनी मार्फत बांधांवर खत १०:२६:२६ एफको ५ मे.टन व युरिया ५ मे.टन वितरण शुभारंभ मा.ना.श्री. दादाजी भुसे साहेब कृषी व माजी सैनिक कल्याण मंत्री महाराष्ट्र राज्य यांचे शुभहस्ते करण्यात आला, तसेच कृषी विभाग माफ॔त राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान अंतर्गत तालुक्यातील ५ शेतकऱ्यांना प्रातीनिधिक स्वरूपात प्रमाणित तुर बियाणे मिनी कीट वाटप करण्यात आले.तसेच नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत सन 2021- 22 मध्ये कम्बाईन हार्वेस्टर श्री. संभाजी प्रताप पाटील रा.जानवे , राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजना व कृषी यांत्रिकीकरण उप अभियान अंतर्गत तालुक्यातील चार शेतकऱ्यांना ट्रॅक्टर व रोटावेटर यांचे अनुदानावर वितरण करण्यात आले , त्यावेळी उपविभागीय कृषी अधिकारी अमळनेर, तालुका कृषी अधिकारी अमळनेर तसेच मंडळ कृषी अधिकारी, कृषी सहाय्यक तसेच कृषी विभागाचे सर्व अधिकारी शेतकरी उत्पादक कंपनीचे अध्यक्ष व सर्व संचालक मंडळ तसेच शेतकरी कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम