कौतुकास्पद : जीव धोक्यात टाकत पोलिसाने दोन चिमुकल्यांना समुद्रातून वाचविले !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २५ जून २०२३ ।  राज्यात पावसाळा सुरु जरी झालेला असला तरी पाऊस येत नसल्याने उकाडा वाढला आहे. तर अनेक लोक समुद्र किनारी जात मूळ फ्रेश करीत असतांना एक परिवार जूहू बीचवर गेले असता त्यांच्या दोन चिमुकल्या जूहू बीचवर समुद्राच्या पाण्यात बुडत असतांना सांताक्रुझ पोलीस ठाण्यातील एका कॉन्स्टेबलनं स्वतःचा जीव धोक्यात घालून वाचवलं आहे. त्यांच्या या धाडसाचं कौतुक होतं असून दोघेही मुलं सुखरुप असून त्यांना त्यांच्या पालकांकडं सुपूर्द करण्यात आलं आहे.

 

मुंबई पोलिसांच्या माहितीनुसार, विष्णू भाऊराव बेळे असं चिमुकल्यांसाठी देवदूत बनललेल्या पोलीस कॉन्स्टेबलचं नाव आहे. शनिवारी कोळीवाडा येथील जुहू बीचवर दोन मुलं समीर पवार (वय १०) आणि भीम काळे (वय ७) ही दोन मुले जुहू बीचच्या जुहू कोळीवाडा लँडिंग पॉईंटच्या टोकावरून समुद्रात उतरली. काही वेळातच ही दोन्ही मुलं समुद्राच्या पाण्याच्या प्रचंड प्रवाहात अडकली, त्यामुळे त्यांना पोहता आले नाही. दरम्यान, दोन लहान मुलं बुडण्यापासून बचावासाठी प्रयत्न करत असल्याचं तिथेच उपस्थित असलेल्या कॉन्स्टेबल विष्णू बेळे यांना दिसले. यानंतर त्यांनी कुठलाही विचार न करता धाडसी निर्णय घेत तात्काळ पाण्यात जाऊन त्यांच्या बचावासाठी प्रयत्न केले. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आलं आणि त्यांनी या दोघा चिमुकल्यांना वाचवलं त्यानंतर त्यांना त्यांच्या पालकांकडं सुपूर्द केलं.मोठ्या धाडसानं प्रसंगावधान राखत बेळे यांनी मुलांना वाचवल्यानं त्यांचं पोलीस दलासह नागरिकांकडूनही कौतुक केलं जात आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम