
खुशी कपूरला दिला कोणत्याही अभिनेत्याला डेट न करण्याचा सल्ला
दै. बातमीदार । २० ऑक्टोबर २०२२ । बॉलीवूडमध्ये कपूर परिवार सर्वांनाच ठावूक आहे. या परिवारातील दोन बहिणी आता सध्या जोरदार चर्चेत आहे. त्या म्हणजे जान्हवी कपूर आणि खुशी कपूर दोघीही बॉलीवूडच्या ग्लॅमरस बहिणी आता अभिनेत्री देखील या दोघी लाडक्या मुली आणि लाखो-करोडो चाहत्यांच्याही फेव्हरेट श्रीदेवी आणि बोनी कपूरच्या या मुली सध्या इंडस्ट्रीतल्या चर्चेतल्या अभिनेत्री आहेत.
जिथे जान्हवी कपूर बॉलीवूडमध्ये आता आपला जम बसवून यशस्वी अभिनेत्रींच्या रांगेत विराजमान झाली आहे तिथे खुशी कपूर नुकतच इंडस्ट्रीत पदार्पण करण्याच्या तयारीत आहे. अशात आता जान्हवीनं आपल्या छोट्या बहिणीला एक सल्ला दिलाय ज्याची जोरदार चर्चा रंगली आहे.
जान्हवीनं आपल्या छोट्या बहिणीला काम करत असताना काय-काय करायचं नाही याविषयी काही गोष्टी स्पष्टच सांगितल्या आहेत. जान्हवीनं आपल्या एका मुलाखतीत खुशी कपूरला कोणत्याही अभिनेत्याला डेट न करण्याचा सल्ला दिला आहे. आता तिनं हे असं का सांगितलं ते चला जाणून घेऊया.
जान्हवी कपूर सध्या आपला आगामी सिनेमा ‘मिली’ मुळे जोरदार चर्चेत आहे. सध्या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये जान्हवी व्यस्त आहे. ‘मिली’ सिनेमा ४ नोव्हेंबरला रिलीज होत आहे. यादरम्यान एका मुलाखतीत तिला विचारलं गेलं की,’मोठी बहिण या नात्यानं तिला खुशी कपूरला काय सल्ला द्यायला आवडेल?’.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम