ठाकरे गटाचे आमदाराचे विधान ; ‘अंदर की बात है, राणे कुटुंब हमारे साथ है’

advt office
बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २० ऑक्टोबर २०२२ । राज्यात राजकीय वादळात कोण कुणाला साथ देईल हे गेल्या दोन दिवसात कोकणच्या राजकारणात समजू शकलेले नाही तर ठाकरे गटाचे आ. राजन साळवी यांनी राणे कुटुंबाबद्दल सूचक विधान केलंय. नितेश राणे हे आमचे विरोधक आहेत. पण, बाळासाहेबांच्या वलयामुळे राणे कुटुंबीय मोठे झालंय. ‘अंदर की बात है, राणे कुटुंब हमारे साथ है’ असं विधान साळवींनी केलं आहे. साळवींना नक्की म्हणायचंय काय…? या विधानाचा अर्थ काय…? साळवी आणि राणेंची जवळीक वाढलीय का…? असे प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतायत.

ग्रामपंचायत निवडणुकीत ठाकरे गटाने बालेकिल्ला कायम राखलाय. यानिमित्ताने राजन साळवी यांनी विविध ग्रामपंचायतीने भेट देत मतदारांचे आभार मानले. यावेळी बोलताना कोणी अंगावर आलं तर शिंगावर घ्यावचं लागतं ही आमची भूमिका असल्याचं राजन साळवी यांनी म्हटलंय. ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांच्या घरावर झालेल्या भ्याड हल्ल्यासंदर्भात बोलताना राजन साळवी यांनी हे वक्तव्य केलं आहे. भास्कर जाधव हे शिवसेनेचे (Shivsena) आक्रमक नेते आहेत, त्यांच्या मनात आणि ह्रदयात जे आहे तेच त्यांच्या ओठावर येतं असं राजन साळवी यांनी सांगितलं. तसंच भ्याड हल्ल्याला उत्तर देण्यास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे (SSUBT) कार्यकर्ते सक्षम असल्याचंही साळवी यांनी म्हटलंय.

नितेश राणे यांनी केलं होतं वक्तव्य
काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषदेत बोलताना भाजप नेते नितेश राणे यांनी गौप्यस्फोट केला होता. ये अंदर की बात है, राजन साळवी हमारे साथ है, असं नितेश राणे म्हणाले होते. तसंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत येण्यासाठी भास्कर जाधव विनवण्या करत होते, असा खुलासाही नितेश राणे यांनी केला होता.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम