बाळ झाल्यावर नवरा बायकोमध्ये का होतो दुरावा !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २० नोव्हेबर २०२२ विवाह हा प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा आहे. लग्नानंतर माणसाचं आयुष्य बदलतं आणि एक नवीन आयुष्य सुरू होतं. लग्नानंतरचे सुरवातीचे दिवस नवरा बायकोच्या नात्यात गोडवा निर्माण करणारे असतात. लग्नाच्या सुरवातीच्या दिवसांमध्ये नवरा बायकोचे एकमेकांवरील प्रेम, विश्वास आणि आकर्षण प्रामुख्याने दिसून येतो पण असं म्हणतात की मुलं झाल्यानंतर नवरा बायकोमध्ये आधीसारखं आकर्षण राहत नाही. हे खरंय का? आज आपण या संदर्भातच जाणून घेणार आहोत.

खरं मुलं झाल्यानंतर सर्वात प्रथम जबाबदारी वाढते. त्यामुळे नवरा बायको एकमेकांपेक्षा लहान बाळाची जास्त काळजी घेतात. मुलं झाल्यानंतर मुलाच्या संगोपनात जास्त वेळ जातो त्यामुळे नवरा बायको एकमेकांना वेळ देऊ शकत नाही पण याचा अर्थ हा होत नाही की त्यांच्यामधील प्रेम किंवा काळजी कमी होते. उलट मुलं होताच नवरा बायकोच्या नात्यातील प्रेमाची परिपक्वता वाढते आणि प्रेम अधिकच घट्ट होते. मुलांच्या गोड जबाबदाऱ्या सांभाळताना पती-पत्नी मधील प्रेम ही वाढते. मुलांचे संगोपन करताना पती-पत्नी एका वेगळ्या रुपात एकमेकांना बघतात त्यामुळे त्यांचा एकमेकांविषयी आदर वाढतो. मुलांचे शिक्षण असो किंवा लग्न पार पडल्यानंतर पती-पत्नी मधील प्रेम, काळजी वाढत्या वयासोबत वाढत जाते.

 

दोघांमध्ये प्रामाणिकपणा असायलाच हवा.

दोघांनी सुंदर, स्वच्छ, नीटनेटकेपणा जपला पाहिजे.

नात्यात उदास, नकारात्मक, राहू नये.

नेहमी चेहरा हसरा असावा. एकमेकांसोबत बोलण्यासाठी उत्सुक असावे.

कुठल्याही विषयावर मनापासून चर्चा करावी

एकमेकांना प्रोत्साहन द्यावे, कौतुक करावे.

रागीट स्वभावावर नियंत्रण ठेवावे.

महिन्यातून एकदा तरी घरा बाहेर फिरायला जावे. एकमेकांना आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करावा.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम