होळीनंतर सोन्याचे दर झाले स्वस्त !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । ८ मार्च २०२३ । होळीच्या तोंडावर सोन्याच्या दरात तेजी दिसून आली होती. मात्र आता होळीच्या दिवशी सोने स्वस्त झाले असून चांदीचे दर स्थिर असल्याचे पाहायला मिळत आहेत. गेल्या काही दिवसांपासून सोने-चांदीच्या दरात सातत्याने चढ-उतार पाहायला मिळत आहेत. आज देशात 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 51,380 रुपये आहे. तर काल हे दर 51,530 रुपये एवढे होते.

म्हणजेच आज दीडशे रुपयांने सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. त्याच वेळी 24 कॅरेट सोन्याची किंमत 56,090 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. गेल्या दिवशी 24 कॅरेट सोन्याचा 10 ग्रॅमचा भाव असाच होता. गेल्या पंधरा दिवसात म्हणजेच 25 फेब्रुवारीला शुद्ध सोन्याचा भाव 56,330 रुपये होता. तर 22 कॅरेटचा भाव 51650 रुपये होता. आजच्या भावाशी तुलना केली असता, 22 कॅरेटच्या भावात 300 रुपयांची तर 24 कॅरेट सोन्यात 220 रुपयांची वाढ झाली आहे. पण 2 फेब्रुवारी 2023 रोजी सोने 58,880 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले होते. त्यामानाने सध्या सोने अजूनही स्वस्तात खरेदी करण्याची संधी आहे.

चेन्नई – 57,110 रुपये
दिल्ली – 56,500 रुपये
हैदराबाद – 56,350 रुपये
कोलकत्ता – 56,350 रुपये
लखनऊ – 56,500 रुपये
मुंबई – 56,350 रुपये
पूणे – 56,350 रुपये

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम