शिवसेना पक्षफुटीनंतर ‘पॉवर फुल’ नेता करणार ठाकरे गटात प्रवेश !

बातमी शेअर करा...

बातमीदार | ४ सप्टेंबर २०२३ | राज्यातील शिवसेना पक्षातून बंडखोरी एकनाथ शिंदेंसह ४० आमदारांनी केल्यामुळे पक्षात मोठी फूट पडली असून बहुसंख्य आमदार आणि खासदार शिंदे गटात सामील झाले आहेत. याशिवाय अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनीही शिंदे गटात प्रवेश केला आहे. पक्षाला खिंडार पडल्यानंतर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पक्षबांधणीला सुरुवात केली आहे. अलीकडेच शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी ठाकरे गटात प्रवेश केला. यानंतर आता अहमदनगर जिल्ह्यातील आणखी एक ‘पॉवर फुल’ पुतण्या ठाकरे गटात प्रवेश करणार आहे.

माजी मंत्री व भारतीय जनता पार्टीचे बडे नेते बबनराव पाचपुते यांचे पुतणे साजन पाचपुते ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत. आज ४ ऑगस्ट सायंकाळी पाच वाजता साजन पाचपुते ‘मातोश्री’वर जाऊन ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी याबाबत ट्वीट करत माहिती दिली. शिर्डी मतदारसंघाचे माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्यानंतर अहमदनगर जिल्ह्यातील आणखी एक महत्त्वाचा नेता ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याने जिल्ह्यात ठाकरे गटाची ताकद वाढण्याची शक्यता आहे.

खासदार संजय राऊत ट्वीटमध्ये म्हणाले, “अहमदनगर जिल्ह्यातल्या राजकारणातील आणखी एक पॉवर फुल पुतण्या आज शिवसेनेत! सायंकाळी पाच वाजता मातोश्रीवर साजन पाचपुते वाजत-गाजत शिवसेनत प्रवेश करणार…”

 

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम