अखेर गृहमंत्री फडणवीसांनी मागितली माफी !

बातमी शेअर करा...

बातमीदार | ४ सप्टेंबर २०२३  |  जालना जिल्ह्यात झालेल्या मराठा समाजावरील लाठीचार्जनंतर राज्यातील अनेक जिल्ह्यात बंद पुकारण्यात आला आहे. तर अनेक ठिकाणी मोर्चे आणि निदर्शने करण्यात आली. मराठा समाजाला आरक्षण द्यावे मराठा समाजाला आरक्षण द्यावे सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सिल्लोड शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला आहे. दरम्यान काही आक्रमक आंदोलनकर्त्यांनी स्वतःची दुचाकी जाळून राज्य सरकारचा निषेध नोंदविला. यावर आता राज्याचे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेद्र फडणवीस यांनी माफी मागितली आहे.

जालन्यात जे काही झाले ते दुर्दैवी आहे, त्याचं समर्थन होऊ शकत नाही. मुख्यमंत्री असताना अनेक आंदोलन झाली पण बळाचा वापर झाला नाही. ज्यांना त्रास झाला त्यांची माफी मागतो. दोषींवर कारवाई होणार मात्र राजकारण योग्य नाही, काही पक्ष तस करत आहेत. लाठीचार्ज करण्यासाठी आदेश एस पी डीऐसपी यांच्या स्तरावर होतो असे फडणवीस म्हणाले. मराठा आरक्षण आणि मराठा विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षण घेण्यासाठीचे निर्णय महायुतीच्या काळात झाले, असे वक्तव्य महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीनंतर थोड्याच वेळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पत्रकार परिषद घेणार आहेत. यावेळी या बैठकीत नेमकी कोणत्या मुद्द्यांवर भाष्य करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम