सुशांतच्या निधनानंतर गर्लफ्रेंड करतेय बिझनेसमनला डेट !

बातमी शेअर करा...

बातमीदार | ३१ ऑगस्ट २०२३ | देशभरात अनेक अभिनेत्री व अभिनेते आपल्या खाजगी आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत येत असतात, अशीच एक अभिनेत्री बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपुतच्या निधनानंतर मोठ्या चर्चेत आली होती. कारण ती अभिनेता सुशांत सिंग राजपुतची गर्लफ्रेंड असल्याचे समोर आले होते. ती अभिनेत्री म्हणजे रिया चक्रवर्ती आहे, आता पुन्हा एका वेगळ्या घटनेने ती चर्चेत आली आहे. सध्या अभिनेत्री एका अब्जाधीश बिझनेसमनला ती डेट करत असल्याची माहिती मिळत आहे. सुशांत सिंगच्या निधनानंतर रियाच्या आयुष्यात एका बिझनेसमनची एन्ट्री झाल्यामुळे ती तुफान चर्चेत आली आहे.

ध्या रिया चक्रवर्तीचं बिझनेसमन निखिल कामतसोबत नाव जोडलं जात आहे. अनेक मीडिया रिपोर्टनुसार, निखिल कामत हा ‘जेरोधा’ या इंडियन फायनंशियल कंपनीचा को-फाउंडर आहे.. रिया चक्रवर्तीच्या आयुष्यात निखिलच्या माध्यमातुन प्रेमाची एन्ट्री झाल्यामुे ते तुफान चर्चेत आले आहे. पण या दोघांनीही याबद्दल अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिली नसून या केवळ अफवा आहेत.
अनेकदा रिया चक्रवर्ती तिच्या लव्ह लाईफमुळे बरीच चर्चेत आली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी रिया टीम इंडियाचा दिग्गज बॅट्समन विराट कोहलीचा मॅनेजर बंटी सजदेहसोबत देखील तिचं नाव जोडलं होतं. बंटीबद्दल सांगायचं तर, बॉलिवूडचा भाईजानची वहिनी सीमाचा तो भाऊ आहे. सोबतच निखिलने अभिनेत्री आणि मिस वर्ल्ड मानुषी छिल्लरला देखील डेट केल्याच्या चर्चा आहेत.
रिया सध्या ३१ वर्षांची तर, निखिल कामत ३६ वर्षांचा आहे. रिया सध्या रोडिज या रिॲलिटी शोमध्ये गँग लिडरचे पात्र साकारताना दिसत आहे. निखिलहा बिझनेस क्षेत्रातील एक प्रसिद्ध चेहरा असून त्याने डाऊन टू अर्थ आपल्या व्यावासयिक आयुष्याची सुरूवात केली. तो जॉबसोबतच स्टॉक मार्केटमध्येही ट्रेडिंग करतो. ‘जेरोधा’ कंपनीमध्ये निखिलसोबतच त्याच्या भावाचीही पार्टनरशिप आहे. निखिलने खूप लहान वयातच प्रसिद्धी मिळवली. त्याने आपल्या कमाईतला अर्धा हिस्सा दान करण्याचा निर्णय घेतला होता. निखिल कामतने इटलीतील अमांडा पूरवांकारासोबत २०१९ सोबत लग्नगाठ बांधली होती. त्यांचे काही नाते जास्त काळ टिकले नाही अवघ्या काही दिवसातच त्यांनी एकमेकांसोबत वेगळा राहण्याचा निर्णय घेतला.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम