स्वराज्य पक्षाला इंडिया आघाडीचे निमंत्रण !

बातमी शेअर करा...

बातमीदार | ३१ ऑगस्ट २०२३ | मुंबईत आजपासून देशातील प्रमुख विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीची बैठक सुरु झाली असून या बैठकीत देशभरातील विविध पक्षांचे नेते सहभागी झाले आहेत. अशात राज्यातील पक्षांनाही आमंत्रण देण्यात आलं आहे. संभाजीराजे छत्रपती यांच्या स्वराज्य पक्षालाही निमंत्रण देण्यात आल्याची चर्चा होती. तसंच संभाजीराजे या बैठकीला उपस्थित राहतील, अशीही चर्चा होती. त्यावर आता स्वत: संभाजीराजे यांनीच स्पष्टीकरण दिलं आहे. स्वराज्य पक्षाचा इंडिया आघाडीशी काहीही संबंध नाही, असं स्पष्टीकरण संभाजीराजे यांनी दिलं आहे.

स्वराज्य संघटनेचे प्रवक्ते करण गायकर यांनी इंडिया आघाडीच्या बैठकीवर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी टीव्ही 9 मराठीला ‘स्वराज्य’ ची भूमिका सांगितली आहे. जयंत पाटील यांनी स्वराज्य पक्षाचे नाव घेतलं. मात्र आमच्याच अशी कोणतीही चर्चा झालेली नाही. जयंत पाटील असं विधान करून दिशाभूल करत असल्याचा आरोप करण गायकर यांनी केला आहे. स्वराज्य पक्षाचा इंडिया आघाडी किंवा महायुतीशी कोणताही संबंध नाही. आज इंडिया आघाडीची मुंबईत बैठक होतेय. मात्र बैठकीचं स्वराज्य पक्षाला कोणतंही निमंत्रण देण्यात आलेलं नाही, असं स्पष्टीकरण करण गायकर यांनी दिलं आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम