राज्यात मराठा आरक्षणानंतर ओबीसी समाजाचे आंदोलन सुरु !
बातमीदार | १३ सप्टेंबर २०२३ | कुणबी ओबीसी आंदोलन कृती समितीतर्फे आरक्षण बचावच्या मागणीसाठी संविधान चौकात सुरू असलेल्या बेमुदत आंदोलनाला मंगळवारी तेली, माळी, पवार, शाहू अशी विविध समाजाच्या संघटनांनी पाठिंबा दिला. समाजाच्या प्रतिनिधींनी आंदोलनस्थळी येऊन समर्थनाचे पत्र कृती समितीचे अध्यक्ष पुरुषोत्तम शहाणे पाटील यांना सुपूर्द केले.
कुणबी ओबीसी आंदोलन कृती समिती व राष्ट्रीय ओबीसी महासंघातर्फे १७ सप्टेंबरला जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याची घोषणा डॉ. बबनराव तायवाडे यांनी केली. राज्य सरकारने मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण न देण्याबाबत लेखी हमी दिली नाही तर सोमवारपासून आमरण उपोषण करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला. मराठा समाजाला ओबीसीमध्ये समाविष्ट करू नये, या प्रमुख मागणीसह विविध मागण्यांसाठी मंगळवारी खामगाव (जि. बुलढाणा) येथे दुपारी राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने मोर्चा काढण्यात आला. मोर्चा उपविभागीय कार्यालयावर धडकला. यावेळी तीव्र निदर्शनेही करण्यात आली. शिष्टमंडळाने विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना सादर केले.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम