
जिल्ह्यात १५ तारखेनंतर जोरदार बरसणार पाऊस !
बातमीदार | १३ सप्टेंबर २०२३ | जिल्ह्यात सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच जोरदार पाऊस झाल्यामुळे शेतकरी सुखावला आहे. दरम्यान, १५ ते १७ सप्टेंबरदरम्यान पुन्हा या महिन्याच्या दुसऱ्या टप्प्यात जिल्ह्यात जोरदार पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे दुष्काळाची शक्यता आधी वर्तविली जात असताना, सप्टेंबरमधील पाऊस ऑगस्ट महिन्यातील पावसाची तूट भरून काढण्याची शक्यता आहे.
जळगाव जिल्ह्यात यंदा पावसाचा खंड व जोरदार पाऊस असा बदललेला पावसाचा पॅटर्न दिसून येत आहे. जून महिन्यात पावसाने पाठ फिरवली, त्यानंतर जुलै महिन्यात सरासरी पेक्षाही अधिक पाऊस झाला. त्यानंतर पुन्हा ऑगस्ट महिन्यात पावसाने पाठ फिरवली. तर सप्टेंबर महिन्यात देखील सरासरीपेक्षा अधिक पाऊस होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जिल्ह्यात ६ ते ९ सप्टेंबरदरम्यान १०९ मिमी पाऊस झाला. तर आता १५ ते १७ सप्टेंबरदरम्यान पुन्हा ९० ते १०० मिमी पाऊस होण्याची शक्यता आहे. जर एवढा पाऊस झाला तर जिल्ह्यात सरासरी इतका पाऊस एलनिनोचा परिणाम असतानाही होऊ शकतो.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम