गुजरातच्या निवडणुकीत विजय झाल्यानंतर हा नेता घेणार मुख्यमंत्रीपदी शपथ !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । ८ डिसेंबर २०२२ ।  देशात जोरदार चर्चेत असलेली निवडणूक म्हणजे गुजरातच्या निवडणुकीचा आज निकाल येत असतानाच पण मुख्यमंत्री कोण होणार? याबाबत विविध नावं चर्चेत होती. पण आता या चर्चांना पूर्णविराम मिळाला असून विद्यमान मुख्यमंत्री भुपेंद्र पटेल हेच मुख्यमंत्रीपदाची पुन्हा शपथ घेणार आहे.

 

भाजपचे प्रदेशाध्यक्ष सीआर पाटील यांनी ही घोषणा केली आहे. येत्या १२ डिसेंबर रोजी दुपारी २ वाजता नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडेल. या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उपस्थित राहणार आहेत. भाजपनं या निवडणुकीत रेकॉर्डब्रेक जागा जिंकल्या आहेत.

‘चंद्रकांत रघुनाथ पाटील’ विजयाचे खरे हिरो

गुजरात भाजप संघटनेतील पेज कमितीला मजबूत करण्यात आले तर त्याचा थेट फायदा पक्षाला होईल, असा दावा गुजरात भाजपचे प्रदेशाध्यक्ष सी आर पाटील यांनी विधानसभा निवडणुकीत केला होता. त्यांनी राज्यभर दौरे करून कार्यकर्त्यांचे मेळावे घेतले. अखेरिस विधानसभा निवडणुकीचे निकाल आले तेव्हा पेज कमिटीची खरी ताकद दिसून आली.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम