तर “काँटे की टक्कर” झाली असती ; संजय राऊत यांची पहिली प्रतिक्रिया !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । ८ डिसेंबर २०२२ ।  देशातील भाजपने गुजरातमध्ये निवडणूक एकतर्फी केल्याने विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहे तर यावर ठाकरे गटातील संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले कि, गुजरातचा निकाल हा अपेक्षित असून, तिकडे जर ‘आप’सह इतर पक्षांनी युती करून भाजपविरोधात निवडणूक लढवली असती, तर नक्कीच “काँटे की टक्कर” द्यावी लागली असती. पण, दिल्ली तुम्ही घ्या गुजरात आम्हाला सोडा, असे काहीतरी झाले असावे अशी लोकांच्या मनात शंका आहे, असे म्हणत आम आदमी पार्टी आणि भाजपचे साटेलोटे असल्याची प्रतिक्रिया शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली. ते आज मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.
आज हिमाचल प्रदेश आणि गुजरात विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. त्यावर बोलताना राऊत म्हणाले की, देशात तीन महत्वाची निवडणुका झाल्यात. त्यात दिल्ली महानगरपालिका तिथे भारतीय जनता पक्षाची 15 वर्षाची सत्ता आम आदमी पार्टीने खेचून घेतली. मतविभागनी झाली नसती, तर ‘आप’ला आणखी चांगल्या प्रकारे निकाल घेता आला असता, पण तरीही दिल्लीत मिळालेला कल हा कौतुकास्पद आहे. दिल्लीमध्ये 15 वर्षाची सत्ता भाजपसारख्या पक्षाकडून खेचून घेणे सोपे काम नाही.

पुढे राऊत म्हणाले की, हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेस चांगल्या प्रकारे लढत देत असून, हे चित्र आशादायी आहे. तीन प्रमुख निवडणुकांमध्ये गुजरात भाजपला मिळाले असून दिल्ली हातून गेली आहे. हिमाचलमध्ये भाजपला संघर्ष करावे लागणार असून तिथे काँग्रेस जिंकणार, असा विश्वास राऊत यांनी व्यक्त केला आहे. गुजरातमधल्या विजयाबद्दल आम्ही भाजपचे अभिनंदन करतो. त्याबरोबरच दिल्लीच्या विजयासाठी आपला देखील शुभेच्छा. हिमाचलसाठी काँग्रेसचे कौतुकच करावे लागेल. आगामी निवडणुकांसाठी सर्व विरोधी पक्षांना एकत्र यावे लागेल. अहंकार दूर ठेवून विरोधी पक्ष सोबत लढला तर 2024 मध्ये परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम