कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी घेतली राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट

advt office
बातमी शेअर करा...

मुंबई दि ६ सप्टेबंर | राज्यात सध्या अतिवृष्टी आणि सततच्या पावसामुळे पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार साहेबांनी 19 ते 21 ऑगस्ट दरम्यान विदर्भ आणि मराठवाड्याचा दौरा करून नुकसानीची पाहणी केली.* तसेच बळीराजाच्या समस्या आणि दुःख समजून घेण्यासाठी १ आणि २ सप्टेंबर रोजी मेळघाटातील धारणी तालुक्याचा दौरा केला. या दौरा दरम्यान त्यांनी *एक दिवस माझ्या बळीराजासोबत* या अभियानाचा शुभारंभ केला. या दोन्ही दौऱ्यांचा अहवाल सादर करण्यासाठी आणि नेमकी परिस्थिती काय आहे ते सांगण्यासाठी कृषिमंत्री सत्तार यांनी महामहीम राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची आज राजभवनात भेट घेतली. या भेटीदरम्यान शेतीच्या नुकसानीच्या संदर्भात चर्चा करून त्या समस्येतून राज्यातील बळीराजाला कसे बाहेर काढता येईल यासंदर्भात चर्चा केली. राज्यपाल कोश्यारीजी यांनी मार्गदर्शन केले. यावेळी कृषी विभागाचे सचिव एकनाथ डवले उपस्थित होते.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम