तय्यब ज़फ़र सह अनेक मुस्लिम तरुणांचा वंचित आघाडीत प्रवेश

निवृत्त पोलीस अधिकारी यांचाही समावेश

बातमी शेअर करा...

 

 

औरंगाबाद दि ५ सप्टेबंर | वंचित बहुजन आघाडी मध्ये विविध स्तरातून सहभाग वाढत आहे याचाच भाग म्हणून वंचित बहुजन आघाडीत अनेक मुस्लिम तरुणांचा जाहीर प्रवेश पार पडला या औचित्यावर राज्य प्रवक्ते फारूक अहमद यांच्या उपस्थितीत सुभेदारी विश्रामगृह औरंगाबाद येथे पत्रकार परिषद घेण्यात आली आयोजित पत्रकार परिषदेत शहरातील निवृत्त पी एस आय पंढरीनाथ भालेराव व सांडुजी बनकर, जनआंदोलनातुन पुढे आलेले युवा नेतृत्व तय्यब जफर व युवा नेते शादाब सिद्यीकी सह अनेक मुस्लिम कार्यकर्त्यांचा जाहीर प्रवेश झालाआहे.

 

या वेळी फारूक अहमद म्हणाले की वंचित बहुजन आघाडी हा महाराष्ट्रात झपाट्याने वाढणारा पक्ष असून या पक्षांमध्ये मुस्लिम दलित ओबीसी सह सर्व वंचित घटक फार मोठ्या प्रमाणात जुळल्या जात आहेत . वंचित शोषीत, मुस्लिम आणि मायक्रो ओबीसी समाज एक झाल्यास औरंगाबादचा खासदार काय तर औरंगाबादचा महापौर सुद्धा निवडून येणे सोपे आहे. वंचित बहुजन आघाडी एकमेव पक्ष असा आहे जो वंचितांना योग्य प्रतिनिधित्व व न्याय मिळवून देऊ शकतो याची खात्री पटल्यामुळे सर्व समाजाचे लोक वंचित बहुजन आघाडीकडे आकर्षित झाले आहेत.

 

औरंगाबाद येथील शाहीन बाग आंदोलनातुन समोर आलेल तरुण नेतृत्व वंचितकडे आकर्षीत होत आहेत कारण त्यांना मुस्लिम इतर समुहांसोबत जुडल्या शिवाय निवडणुकीचे राजकारण करुन सत्ते मध्ये बसु शकत नाही याची जाणीव झालेली आहे अशी प्रतिक्रीया नुक्तच प्रवेश केलेले तय्यब जफर यांनी दिली.

 

या पत्रकार परिषदेस औरंगाबाद जिल्हाध्यक्ष योगेश बन, माजी विरोधी पक्ष नेते मिलिंद दाभाडे, माजी नगरसेवक कृष्णा बनकर, शहराध्यक्ष जलीस अहमद, वंचित बहुजन युवा आघाडी जिल्हाध्यक्ष सतीश गायकवाड, महिला शहर अध्यक्षा वंदनाताई नरवडे, जिल्हा उपाध्यक्ष रूपचंद गाडेकर, प्रसिद्धीप्रमुख भाऊराव गवई, जिल्हा उपाध्यक्ष ॲड रामेश्वर तायडे, अब्दुल समद, मिलिंद बोर्डे, कामगार आघाडीचे शहराध्यक्ष राजू देहाडे, वंचित बहुजन युवा आघाडीचे सतीश शिंदे, महासचिव सलीम पटेल, युवा आघाडी पुर्व शहराध्यक्ष अफसर खान पठान, सलीम सिद्यीकी, शितल बनकर, वर्षा खरात, प्रविण जाधव आदींची प्रमुख उपस्थिती होती.

 

 

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम