कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांचा शेतकरी संजय धांडे यांच्या घरी जेवण व मुक्काम

"माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी"उपक्रम

बातमी शेअर करा...

अमरावती,मेळघाट दि १ सप्टेबंर |

सुलभ आणि प्रभावी कृषि विषयक धोरण तयार करण्यासाठी शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी व प्रश्न प्रशासनाने समजून घेणे, त्यावर कोणत्या उपाययोजना करून धोरणात्मक निर्णय घेणे आवश्यक आहे. यासाठी प्रशासनातील अधिकारी, पदाधिकारी संपूर्ण एक दिवस शेतकऱ्यांसोबत व्यतीत करून शेतकरी समस्यांचे मुळापर्यंत जाणेसाठी राज्याचे कृषि मंत्री अब्दुल सत्तार यांनी “ माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी ” हा उपक्रम राज्यभर राबविण्याची संकल्पना मांडलेली आहे.

या उपक्रमाचा कालावधी १ सप्टेंबर २०२२ ते ३० नोव्हेंबर २०२२ पर्यंत राहणार आहे. या उपक्रमांतर्गत प्रशासनातील सर्व वरिष्ठ अधिकारी, विद्यापीठाचे शास्त्रज्ञ सकाळपासून संध्याकाळपर्यंत संपूर्ण एक दिवस शेतकऱ्यांसोबत प्रत्यक्ष शेतावर व ग्रामीण भागात राहून त्यांचे दैनंदिन शेतीच्या कामकाजात येणाऱ्या अडचणीवार त्यांचे सोबत त्यांच्या विविध कामांत सहभागी होऊन चर्चा करणार आहेत.

या उपक्रमाची राज्यस्तरीय सुरुवात आज १ सप्टेंबर, २०२२ रोजी स्वत: कृषि मंत्री महाराष्ट्रातील अत्यंत दुर्गम अशा मेळघाटातून केली आहेत. धारणी तालुक्यातील साद्रावाडी या अत्यंत दुर्गम ,डोंगराळ, कोरडवाहू व आदिवासी बहुल तालुक्यातील शेतकऱ्यांसोबत ते आज संपूर्ण दिवसभर असणार आहेत.

राज्यातील शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी,समस्या, त्यातून निर्माण होणारे नैराश्य व त्यातून उद्भवणाऱ्या शेतकरी आत्महत्या यासंदर्भात योजना तयार करणारे व ती राबविणारे शासनाचे वेगवेगळे विभाग यांना याबाबतची कारणमीमांसा करून आत्मपरीक्षण करणे आवश्यक आहे या अनुषगाने हा उपक्रम सुरू केलेला आहे.

 

काल रात्री 9 वाजता मंत्री अब्दुल सत्तार यांचे साद्रावाडी गावात आगमन झाले. संजय किसन धांडे या शेतकऱ्याच्या घरी त्यांनी रात्रीचे जेवण करून याच ठिकाणी मुक्काम केला. यावेळी मंत्री अब्दुल सत्तार यांनी गावातील सुभाष पटेल, दत्तात्रय पटेल, बाबूलाल जावरकर, अशोक पटेल, लक्ष्मीकांत पटवारकर आदी शेतकऱ्यांशी संवाद साधला.

 

विभागीय कृषी संचालक किसन मुळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनिल खर्चान, उपविभागीय कृषी अधिकारी विजय पठाडे, तहसीलदार प्रदीप शेवाळे, गटविकास अधिकारी आदी शासकीय अधिकारी गावात मुक्कामास होते.

 

सकाळी उठल्यानंतर मंत्री अब्दुल सत्तार यांनी गावातील शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या. शेतकऱ्यांना कृषी विभागासह शासनाच्या विविध योजनेचा लाभ मिळतो का याबाबत माहिती जाणून घेत शेतकऱ्यांना विविध योजनांची माहिती दिली.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम