5G ग्राहकांसाठी एअरटेलची मोठी ऑफर ; इतके असणार प्लान !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १७ मार्च २०२३ । सध्या भारतामध्ये एअरटेलसह सर्वच कंपनीचे 4G नेटवर्क सुरु आहे. त्यातील एकही ग्राहकांना यांची रेज येत नसल्याचा सामना करावा लागत आहे. त्यावर एअरटेलने 5G ग्राहकांसाठी ‘अनलिमिटेड डेटा’ ऑफर आणली आहे. भारती एअरटेल ही भारतातील लीडिंग टेलिकॉम सर्व्हिस प्रोव्हायडर आहे. 17 मार्च रोजी एअरटेलने एक खास प्लॅन ऑफर केलाय. Airtel ने आज Airtel 5G Plus नेटवर्कला प्रोत्साहन देण्यासाठी आपल्या ग्राहकांसाठी अनलिमिटेड 5G डेटा लॉन्च करण्याची घोषणा केली.

आता ग्राहकांना डेटा संपण्याची चिंता न करता अल्ट्राफास्ट, विश्वासार्ह आणि सुरक्षित 5G प्लस सेवेचा लाभ घेता येईल.कंपनीने सर्व विद्यमान प्लॅनमधील डेटा वापरावरील मर्यादा काढून टाकली आहे.प्रीपेड आणि पोस्टपेड ग्राहक याचा वापर करु शकतात. परंतु त्याची अट अशी आहे की ग्राहकांचा प्लॅन 239 रुपयांपेक्षा जास्त असावा.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम