
अजयच्या ‘भोला’ चित्रपटाने पहिल्या दिवशी केली कमाई !
दै. बातमीदार । ३१ मार्च २०२३ । देशात अनेक चित्रपट सुपर हिट होतात त्याच्यात मोठ्या प्रमाणात शाहरुख खानच्या ‘पठाण’ नंतर अजय देवगणच्या याआधी रिलीज झालेल्या ‘दृश्यम २’ या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. काल रामनवमीच्या मुहूर्तावर अजयचा ‘भोला’ हा सिनेमा रिलीज झाला. रिलीजआधी या सिनेमाची जोरदार हवा होती.
साहजिकच सगळ्यांच्या अपेक्षा वाढल्या होत्या. ‘पठाण’ आणि ‘तू झुठी में मक्कर’नंतर सर्वांच्या नजरा अजय देवगणच्या ‘भोला’ या चित्रपटाकडे लागल्या होत्या. तर आता ‘भोला’च्या पहिल्या दिवशीच्या कमाईचे आकडे समोर आले आहेत.
‘भोला’तील अजय देवगणच्या अभिनयाचं जोरदार कौतुक होतंय. सोशल मीडियावरही हा सिनेमा फुल्ल पैसा वसूल असल्याच्या प्रतिक्रिया पाहायला मिळत आहे. बॉक्स ऑफिसवरही ‘भोला’ची काय स्थिती आहे तर या सिनेमाला प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळाल्याचं चित्र आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम