अजित पवारांची मुख्यमंत्र्यावर सडकून टीका !
दै. बातमीदार । ८ मे २०२३ । देशातील अनेक मोठे प्रकल्प राज्याबाहेर गेले आहे. त्यानंतर दुसरे प्रकल्प आणू म्हणताहेत पण यांच्यामध्ये प्रकल्प आणण्याची धमक नाही, अशा शब्दांत राज्याचे विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर सडकून टीका केली आहे. साताऱ्यात एका जाहीर सभेत ते बोलत होते.
राज्यातील बेरोजगारांना नोकऱ्या मिळत नाहीएत. दीड-दोन लाख तरुणांना नोकऱ्या देणारे प्रकल्प परराज्यात गेले. आम्हाला सांगितलं की नवे प्रकल्प आणतो पण यांनी काहीही आणलेलं नाही. आणायची धमक पण नाही यांची, अशा शब्दांत अजित पवारांनी CM एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला. मध्यंतरी यांनी गाजर दाखवलं की, शासकीय नोकरभरती करणार ७५,००० तरुणांना नोकरी लावणार. काय झालं त्याचं? कुठे गेल्या त्या नोकऱ्या? काही नाही. वेगवेगळे प्रश्न, वेगवेगळ्या अडचणी! मंत्रालयात कोणी बसायला तयार नाही. मंत्रालयात कोण किती दिवस असतात याची माहिती घ्या, असंही पवार यावेळी म्हणाले.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम