जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय यांना ईडीची नोटीस !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । ८ मे २०२३ । देशासह राज्यातील अनेक नेत्यासह अधिकारीना गेल्या काही वर्षापासून ईडीच्या नोटीसा येवून लागल्या आहेत. आता छत्रपती संभाजी नगराचे जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय यांना देखील ईडीने नोटीस बजावली आहे. त्यामुळे त्यांच्या अडचणीत मोठी वाढ झालेली आहे.

आस्तिककुमार पांडेय हे 2011 च्या बॅचचे महाराष्ट्र केडरचे आयएएस अधिकारी आहेत. महापालिका आयुक्त म्हणून आस्तिक कुमार पांडेय यांनी ९ डिसेंबर २०१९ मध्ये पदभार स्वीकारला होता. छत्रपती संभाजीनगरमध्ये आस्तिक कुमार पांडेय आणि त्यांच्या पत्नी आयपीएस मोक्षदा पाटील खूप लोकप्रिय आहेत. पंतप्रधान आवास घोटाळा प्रकरणी छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय यांना ईडीने नोटीस बजावली आहे. पंतप्रधान आवास घोटाळा प्रकरणी त्यांना ही नोटीस बजावण्यात आल्याचं समजतंय.

यापूर्वी महापालिका उपायुक्त आणि अधिकाऱ्यांची चौकशी ईडीने केली होती. शिवाय घरकुल योजनेतील निविदा प्रक्रियेमध्ये सहभागी झालेल्या कंत्राटदाराच्या घरीही ईडीने छापे टाकून चौकशी केली होती.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम