अजित पवारांनी घेतली अर्थ विभागाची बैठक ; अधिकाऱ्यांची उडाली धांदल !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १४ जुलै २०२३ । राष्ट्रवादीत मोठी बंडखोरी झाल्यानंतर अजित पवारांनी थेट उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे पण त्यांना अजून ही कुठलेही खाते मिळाले नसताना त्यांनी आज मंत्रालयातून कामकाजाला सुरुवात केली आहे. अजित पवार आज सकाळी ९.४५ वाजता मंत्रालयात दाखल झाले. यामुळे मंत्रालयातील अधिकाऱ्यांची धांदल उडाली. सध्या अधिकाऱ्यांसोबत अजित पवार यांची बैठक सुरू आहे.

राज्याचे नवनियुक्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या प्रशासकीय कामाला सुरवात केली आहे. अजित पवार यांनी अर्थ विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत त्यांनी एक बैठक बोलावली आहे. अर्थ विभागाचे सचिव डॉ. नितीन करीर यांच्यासोबत ते बैठक घेत आहेत.

अद्याप आधिकृत खातेवाटप झाले नाही, मात्र अजित पवार यांनी अर्थ विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेण्यास सुरूवात केली आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. खातेवाटप जाहीर झालेलं नसताना अजित पवार यांनी आजपासून कामाला सुरवात केली आहे. डॉ. नितीन करीर हे प्रधान सचिव आहेत त्यांच्यासोबत अजित पवारांची बैठक सुरू आहे. तर अधिवेशनामध्ये पुरवणी मागण्या मांडायच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांची महत्वाची बैठक सुरू असल्याची माहीती आहे. तर अजित पवार यांनी ही अर्थ विभागाच्या बैठक बोलावली आहे. याचा अर्थ स्पष्ट आहे कि, अजित पवार यांना अर्थखातं मिळणार आहे. याच अनुषंगाने अजित पवार यांनी ही बैठक बोलावली असल्याची चर्चा सुरू आहे. डॉ. नितीन करीर यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित आहेत. त्यामुळे याबाबतची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. तर लवकरच खातेवाटप होईल आणि अर्थखातं अजित पवारांना मिळण्यावर शिक्कमोर्तब होण्याची शक्यता आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम