शिल्पा म्हणाली सलमान मध्यरात्री घरी यायचा !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १४ जुलै २०२३ ।  बॉलिवूड क्षेत्रातील दिग्गज अभिनेता म्हणून नावारूपास आलेल्या सलमान खान नेहमीच वेगवेगळ्या चर्चेत असतो. त्याचं अनेक अभिनेत्रींसोबत नाव जोडलं गेलं. सलमान आणि ऐश्वर्या रायच्या नात्याची तर जोरदार चर्चा झाली होती. शिवाय त्याचं आणि संगिता बिजलानी यांचं तर लग्नही ठरलं होतं. पत्रिकाही छापल्या होत्या. पण ते लग्न होऊ शकलं नाही. दरम्यान सलमान आणि शिल्पा शेट्टी यांच्याही अफेअरची चर्चा होती. आता शिल्पाने स्वत:च या चर्चांवर स्पष्टीकरण दिलं आहे. काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत शिल्पा म्हणाली, ‘सलमान माझ्या घरी मध्यरात्री यायचा. तो येईपर्यंत मी झोपलेले असायचे. तो माझ्या वडिलांसोबत ड्रिंक करायचा आणि नंतर निघून जायचा. हे मला सकाळी उठल्यालवर कळायचं. मला चांगलंच आठवतं माझ्या वडिलांचं निधन झालं तेव्हा सलमान ढसाढसा रडला होता.’

‘दस का दम शो’मध्ये सलमान ही आठवण सांगताना म्हणाला होता, ‘एकदा मी शिल्पाला डेटवर घेऊन जाण्यासाठी गेलो होतो. तेव्हा ती चेंबूरला राहत होती. मी तिच्या घराखाली पोहोचलो आणि कारमध्येच बसलो होतो. मी वर बघितलं तर तिच्या बाल्कनीत एक ६ फूट उंच माणूस लुंगी घालून उभा होता. ते कोणी दुसरे नाही तर शिल्पाचे वडीलच होते. मी त्यांना पहिल्यांदा बघून घाबरलो होतो. थोडं घाबरतच मी त्यांना विचारलं, तुम्ही कसे आहात. तेव्हा ते भारदस्त आवाजात म्हणाले,मी ठीक आहे. १२ वाजेपर्यंत हिला घरी पोहोचव. तेव्हा मी म्हणालो, साडे अकरा पर्यंतच पोहोचवतो.’ सलमान पुढे म्हणाला, ‘पुढच्या वेळी जेव्हा मी तिच्या घरी गेलो तेव्हा तिच्या वडिलांच्या हातात ग्लास बघितला. तेव्हा मी विचारलं मी सुद्धा तुमच्यासोबत एक ड्रिंक घेऊ शकतो का? त्यानंतर शिल्पा नाही तर मी आणि तिचे वडीलच जास्त गप्पा मारु लागलो. एकदा तर मी सकाळी साडेपाच वाजता तिच्या घरातून निघालो होतो. तेव्हा शिल्पाने हा खुलासाही केला की सलमानला तिने कधीच डेट केले नव्हते. ते फक्त चांगले मित्र होते.’

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम