प्रकृतीचे कारण देत अजित पवारांनी सोडले मौन !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । ११ नोव्हेबर २०२२ शिर्डी येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे शिबीर पार पडले होते. शिबिराच्या शेवटच्या दिवशी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे ब्रीच कॅण्डी रुग्णालयातून तात्पुरता डिस्चार्ज घेऊन हजर राहिले होते. मात्र, अजित पवार गैरहजर दिसले. त्यामुळे अजित पवारांच्या नाराजीची चर्चा सुरु झाली होती. दरम्यान, या पार्श्वभूमीवर भाष्य करत पवार यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

दरम्यान, आठ दिवसांनी माध्यमांसमोर आल्यानंतर त्यांनी यासंदर्भात स्पष्टीकरण दिले. मी नाराज असल्याच्या अफवा आहेत. पाच दिवस मी आजारी होतो. त्यामुळे मी अनेक कार्यक्रमांना हजेरी लावली नव्हती. खोकला सुरू झाला होता, त्यात प्रकृती बरी नव्हती. आता तब्येत बरी आहे. पण काहीही बातम्या सुरू झाल्या होत्या, असे म्हणत नाराजीच्या चर्चांना अजिप पवारांनी पुर्णविराम दिला. तसेच, माझा खासगी दौरा होता. सहा महिन्यापूर्वी मी तिकीट काढली होती. मला खासगी आयुष्यदेखील आहे. असही अजित पवार यांनी ठणकावून सांगितलं.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम