आम्ही सत्तेत असतो तर वेदांता प्रकल्प जाऊच दिला नसता : अजित पवार

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १७ सप्टेंबर २०२२ । वेदांता-फॉक्सकॉनवरून राजकारण सुरु आहे. मात्र हा प्रकल्प महाराष्ट्राबाहेर का गेला? कोणामुळे गेला? हा विचार करायला हवा, असे मत विधानसभा विरोधी पक्षनेते मा. अजितदादा पवार यांनी बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना माध्यमांशी संवाद साधतांना व्यक्त केले.

यावेळी महाविकास आघाडी सरकार सत्तेत असते तर वेदांता प्रकल्प गुजरातला जाऊच दिला नसता असे अजितदादा म्हणाले. हा प्रकल्प महाराष्ट्रात यावा, यासाठी आम्ही प्रचंड प्रयत्न केले होते. या प्रकल्पाची गुजरात राज्यात वळती झाल्यामुळे राज्यातील तरूणाईला काय उत्तर द्यायचे, हा प्रश्न उपस्थित झाला आहे.लाखो रोजगारांपासून तरूणांना वंचित ठेवण्याचे काम राज्य सरकारने केले आहे, अशी टीकाही अजितदादांनी केली आहे.

या प्रकल्पापेक्षा मोठा प्रकल्प राज्यात आणला जाईल असे भाकीत राज्य सरकारकडून केले जात आहे यावर अजितदादा म्हणाले की, त्यांना जो मोठा प्रकल्प आणायचा तो त्यांनी नंतर आणावा. मात्र हा प्रकल्प राज्याला द्यावा, अशी मागणी केली. तसेच वंचित बहुजन आघाडीचे माजी खासदार प्रकाश आंबेडकर यांनी केलेल्या आरोपांचे खंडन करीत प्रकाश आंबेडकर यांनी संपूर्ण माहिती घ्यावी आणि त्यानंतर भाष्य करावे, असा टोलाही लगावला.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम