अजित पवार होणार मुख्यमंत्री ; दिग्गज नेत्याने केला दावा !
दै. बातमीदार । २१ जुलै २०२३ । राज्यातील राष्ट्रवादीते नेते अजित पवार यांच्या बंडानंतर मुख्यमंत्रीपदावरून पुन्हा राजकीय वर्तुळात रस्सीखेच पाहायला मिळत आहे. मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थान वर्षा बंगला परिसरात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मुख्यमंत्री असा उल्लेख असलेले बॅनर लावण्यात आलेत. यानंतर लवकरच अजित पवार हे लवकरच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील आणि ही गोष्ट शिंदे गटातील नेत्यांनी स्वीकारली पाहिजे असं वक्तव्य ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केलं आहे.
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे शासकिय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्याच्या बाहेर राष्ट्रवादीचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मुख्यमंत्री असा उल्लेख करत पोस्टर लावण्यात आले आहेत, याबद्दल विचारले असात राऊत म्हणाले की, मी खात्रीने सांगतो की ते भावी मुख्यमंत्री आहेतच आणि लवकरच मुख्यमंत्री देखील होतील. भावी म्हणजे फार भावी राहणार नाहीत. मलाही राजकारण माहितेय. काय घडामोडी घडतायत तेही माहिती आहे. मग त्या कायदेशीर, राजकीय किंवा घटनात्मक असतील. त्यांचं भविष्य लवकर-लवकर जवळ येतंय. त्यामुळे अजित पवार हे भविष्यात मुख्यमंत्री होतील. महाराष्ट्राला लवकरच नवीन मुख्यमंत्री मिळेल. त्यांच्या (अजित पवार) वाढदिवसाला असे बॅनर लागले असतील तर हे सत्य शिंदे गटाने लवकर स्वीकारलं पाहिजे, असेही राऊत म्हणाले.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम