
अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षपदी पाटीलसह पवारांची निवड !
बातमीदार | १४ सप्टेंबर २०२३ | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटाकडून जळगाव जिल्हाध्यक्षपदी जिल्हा बँकेचे चेअरमन संजय पवार यांची तर जळगाव शहर जिल्हा अध्यक्षपदी अभिषेक पाटील यांची नियुक्ती झाली आहे. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी या नियुक्त्या केल्या असून, त्यांच्याच हस्ते पवार व पाटील यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर पवार व पाटील हे अजित पवार गटात सामील झाले. अभिषेक पाटील यांनी याआधी देखील शहर जिल्हाध्यक्षपद भूषवले आहे.
मुंबईत या निवडीप्रसंगी मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, मंत्री धनंजय मुंडे, आमदार विक्रम काळे, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सूरज चव्हाण, प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गरजे, उमेश नेमाडे, रवींद्र पाटील, माजी युवक अध्यक्ष सुनील पाटील, डॉ. पी. एस. पाटील, गौरव लवंगे उपस्थित होते.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम