गौतमीसाठी तरुणाची हुल्लडबाजी अन पोलिसांचा लाठीमार !

advt office
बातमी शेअर करा...

बातमीदार | १४ सप्टेंबर २०२३  परभणी शहरात मंगळवारी रात्री आयोजित करण्यात आलेल्या गौतमी पाटीलच्या नृत्याच्या कार्यक्रमात हजारोंच्या संख्येने उपस्थित असलेल्या प्रेक्षकांतील काही युवकांनी गोंधळ घातला. खुच्र्यांची मोडतोडसुद्धा करण्यात आली. पोलिसांनी वेळीच परिस्थिती नियंत्रणात आणली. हुल्लडबाजांना आवर घालण्यासाठी पोलिसांना काही प्रमाणात सौम्य लाठीमारसुद्धा करावा लागला.

परभणी शहरात मंगळवारी रात्री माखनचोर दहीहंडी स्पर्धेचे आयोजन केले होते. स्पर्धेसाठी नृत्यांगना गौतमी पाटील यांना विशेष निमंत्रित केले होते. त्यामुळे मोठी गर्दी झाली होती. कार्यक्रमाला सुरुवात झाल्यानंतर काही वेळाने अचानक हुल्लडबाजांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. काहीजणांनी खुर्च्या उधळल्या, तर काहींनी खुर्च्याची मोडतोड करीत जागेवरून पळ काढला. सर्व प्रकार नियंत्रणात आणताना पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला. गौतमी पाटील यांचे नृत्य सादरीकरण होताच अनेकांनी काढता पाय घेतला.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम