सर्व शिवभक्त उदयनराजेंच्या पाठिशी ; अमोल मिटकरिंनी दिला पाठींबा !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । ३ डिसेंबर २०२२ ।  आज रायगडावर ‘निर्धार शिवसन्मानाचा’ मेळावा त्यांनी घेतला. यावेळी बोलताना त्यांनी पुढच्या आंदोलनाची घोषणा केली आहे. पुढचा ‘निर्धार शिवसन्मानाचा’ मेळावा मुंबईच्या आझाद मैदानावर होणार असल्याचं उदयनराजेंनी जाहीर केलंय. त्यांच्या या मेळाव्याला राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी पाठिंबा दिला आहे.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केलं. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची तुलना थेट शिवरायांशी करण्यात आली. त्यानंतर शिवभक्त आक्रमक झाले आहेत. खासदार आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज उदयनराजे भोसले यांनीही आक्रमक पवित्रा घेतला आहे. उदयनराजेंनी काहीवेळा आधीच रायगडावर ‘निर्धार शिवसन्मानाचा’ मेळावा घेतला. उदयनराजे यांनी घेतलेली भूमिका योग्य आहे. त्यांच्या या भूमिकेचं मी एक शिवभक्त म्हणून समर्थन करतो. सर्व शिवभक्त त्यांच्या पाठिशी आहेत. राज्यपालांच्या राजीनाम्यापर्यंत आम्ही मागे हटणार नाही, असं मिटकरी म्हणालेत.
जसं संविधान आणि भाजपचा संबंध नाही. तसं भाजप आणि शिवभक्तीचा दूरदूरपर्यंत काही संबंध नाही. त्यामुळे त्यांचे नेते अशी वक्तव्य करतात. पण त्यांची अशी आक्षेपार्ह वक्तव्य महाराष्ट्र खपवून घेणार नाही , असं अमोल मिटकरी म्हणालेत. महापुरूषांच्या अवमनाविरोधात आमदार रोहित पवार आणि राष्ट्रवादीच्या इतर नेते आत्मक्लेश आंदोलन करत आहेत.वढू बुद्रुक इथे छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधी स्थळावर आत्मक्लेश आंदोलन करण्यात येत आहे. आमदार सुनील टिंगरे, जयदेव गायकवाड, संदीप क्षीरसागर, अशोक पवार, अमोल मिटकरी,नितीन पवार,रुपाली पाटील या आत्मक्लेश आंदोलनात सहभागी झाले आहेत. या आंदोलनावेळी बोलताना अमोल मिटकरी यांनी राज्यपालांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम