हा अभिनेता १८ वर्षानंतर झाला बाबा !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । ३ डिसेंबर २०२२ ।  अभिनेता अपूर्व अग्निहोत्री आणि अभिनेत्री शिल्पा सकलानी हे लोकप्रिय जोडप्यानी ‘परदेस’, ‘प्यार कोई खेल नहीं’ यासांरख्या चित्रपटांतुन आपली ओळख निर्माण केली आहे. दोघेही इंडस्ट्रीतील प्रसिद्ध चेहरे आहेत. त्यांची केमिस्ट्रीही चाहत्यांना फार आवडते . सध्या ते त्याच्या आयुष्यातील खुप आनंदाचे क्षण घालवत आहेत. कारण लग्नाच्या १८ वर्षांनंतर दोघेही पहिल्यांदाच आई बाबा झाले आहेत.
चित्रपटांबरोबरचं तो ‘जस्सी जैसी कोई नहीं’, ‘अजीब दास्तान है ये’ यांसारख्या टीव्ही शोमध्येही दिसला. तर शिल्पा ‘क्यूंकी सास भी कभी बहू थी’, ‘क्या हदसा क्या हकीकत’, ‘कुसुम’, ‘जस्सी जैसी कोई नहीं’, ‘नच बलिए 1’, ‘बिग बॉस 7’.मध्ये दिसली होती.

 

BJP add

अपूर्वने सोशल मीडियावर एका क्यूट व्हिडिओद्वारे याबाबत माहिती दिली आहे. अपूर्व अग्निहोत्रीने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये हे जोडपं आपल्या लहान बाळाला धरलेले आहे. ते दोघेही तिच्याकडे प्रेमाने पाहत आहे. पांढऱ्या आणि गुलाबी रंगाच्या ड्रेसमध्ये त्यांची छोटी परी खूपच क्यूट दिसत आहे. शिल्पाने पिवळ्या रंगाचा ड्रेस घातलाय तर, अपूर्व कॅज्युअल लूकमध्ये दिसत आहे. या जोडप्याचा फॅमिली व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे आणि चाहते त्यांच्यावर प्रेमाचा वर्षाव करत आहेत.

व्हिडिओ शेअर करताना अपूर्वने कॅप्शन दिलयं त्यात त्याने त्याच्या परिचं नावंही सांगितलंय. अपूर्वाने कॅप्शनमध्ये लिहिले की, “तर अशा प्रकारे माझा वाढदिवस माझ्या आयुष्यातील सर्वात खास वाढदिवस बनला, कारण देवाने आम्हाला आतापर्यंतची सर्वात खास, अविश्वसनीय, आश्चर्यकारक, चमत्कारी भेट दिली आहे. आनंदाने शिल्पा आणि मी आमची लाडकी मुलगी ईशानी कानू अग्निहोत्रीची ओळख करून देतो. तिच्यावर प्रेम आणि आशीर्वाद राहू द्या.”

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम