पवार व शेलार यांची युती : राजकीय वाद शमला

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २० ऑक्टोबर २०२२ । राज्याच्या बहुचर्चित निवडणुक असलेल्या अंधेरी विधान सभेच्या निवडणुकीतून भाजपने माघार घेतल्यानंतर आज होणाऱ्या मुंबई क्रिकेट असोसिएशनची होत आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि भाजप नेते आशिष शेलार यांचे पॅनल एकत्र निवडणूक लढवत आहे. तर, उद्धव ठाकरेंचे स्वीय सहायक मिलिंद नार्वेकरदेखील शेलार-पवारांच्या पॅनेलमध्ये आहेत.राजकारण भाजप व शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसमधील वाद एकीकडे शिगेला गेले असताना एकमेकांवर चिखलफेक करणारे हे नेते एमसीए निवडणुकीत मात्र एकत्र आल्याने अनेकांच्या भुवया उंचवल्या आहेत.

BJP add

एमसीएच्या अध्यक्षपदासाठी शरद पवार-आशिष शेलार यांच्या पॅनेलकडून अमोल काळे तर, ‘मुंबई क्रिकेट ग्रुप’ पॅनेलकडून माजी कसोटीवीर संदीप पाटील उभे आहेत. या निवडणुकीत कोण बाजी मारणार, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

बीसीसीआयनंतर सर्वात श्रीमंत क्रिकेट संस्था म्हणून मुंबई क्रिकेट असोसिएशनला ओळखले जाते. एमसीएच्या कार्यक्षेत्रात मुंबई, ठाणे, नवी मुंबई तसेच डहाणू, बदलापूर या परिसरांचाही समावेश होतो. त्यामुळे मुंबई तसेच लगतच्या परिसरातील क्रिकेट क्षेत्रावर या संस्थेचे निर्विवाद वर्चस्व आहे. त्यामुळे अशी ही श्रीमंत आणि प्रभावी संस्था ताब्यात असणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. एमसीएचे एकूण 380 मतदार आहेत. यामध्ये विविध क्लब यांचा समावेश आहे. त्यामध्ये मैदान क्लबचे 211, ऑफिस क्लबचे 78, स्कूल कॉलेज क्लबचे 40 आणि 51 माजी कसोटीवीर असे असे मतदार आहेत. आज दुपारी 3 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत हे मतदार मतदान होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून निवडणुकीत उभे असलेले पवार-शेलार व संदीप पाटील यांचे पॅनल या मतदारांना आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न करत आहेत. आजच्या लढतीत कोण बाजी मारणार, हे पाहावे लागणार आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम