जे आमदार शिंदे सोबत गेले ते काही तरी उद्देशाने गेले : जयंत पाटील

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २० ऑक्टोबर २०२२ । महाराष्ट्रात सत्तांतर झाल्यानंतर महाविकास आघाडी व शिंदे – फडणवीस सरकारच्या आमदारांमध्ये चांगलाच सामना राज्यातील जनतेला पाहायला मिळत आहे. त्यातच आता राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी देखील शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार निशाणा साधलाय.

पहिल्या दिवसापासून या सरकारमध्ये काहीच आलबेल नाहीय. जे लोक शिवसेनेतून फुटून गेले, त्यांनी काही ना काही उद्देश व लाभ ठरवून गेले आहेत, हे जनतेच्या लक्षात आलं आहे. काही आमदार पश्चाताप करत असून काही आमदार पुनर्विचार करायला लागले आहेत. त्यामुळं पुढच्या काळात चित्र वेगळं असेल, असं विधान जयंत पाटील यांनी केलंय. जयंत पाटलांनी पत्रकार परिषदेत शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला. मराठवाड्यातील शेतकऱ्यांची झालेली हानी आणि पुणे शहराची पावसामुळं झालेली प्रचंड वाताहात लक्षात घेता सरकारनं जनतेच्या मदतीला जायला पाहिजे होतं. मात्र, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या दोघांचं दिल्लीला सांभाळण्यात दिवस जात असल्याची जोरदार टीका पाटील यांनी केली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना  नामोहरम करणं आणि त्यांना अडचणीत आणणं असा उद्योग काही लोक करत आहेत. परंतु, त्यांना घाबरवण्याचा कितीही उद्देश असला तरी उद्धव ठाकरे दबावाला बळी पडू शकत नाहीत, असंही पाटील म्हणाले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम