राजस्थान – जालोर येथे विद्यार्थ्यास अमानुषपणे मारहाण करणाऱ्या शिक्षकास फाशीची शिक्षा द्या… -अमळनेरात मोर्चा.

बातमी शेअर करा...

अमळनेर(आबिद शेख)राजस्थान राज्यातील जालोर येथे एका खासगी शाळेत तिसरीत शिकणाऱ्या इंद्रकुमार मेघवाल या अनुसूचित जातीतील (दलित) विद्यार्थ्याने उच्च जातीतील शिक्षकांच्या माठातून पाणी पिले म्हणून छेलसिंग नावाच्या एका शिक्षकाने इंद्रकुमारला बेदम मारहाण केली होती. नंतर उपचारादरम्यान इंद्रकुमार मेघवालचा मृत्यू झाला होता. हे प्रकरण भारतासारख्या लोकशाही व धर्मनिरपेक्ष राष्ट्रासाठी अत्यंत वाईट घटना आहे. भारतात जातीयभेद नष्ट करण्याच्या प्रयत्नांना असे विषय अडथडे ठरू शकतात. म्हणून आज अमळनेरात मोर्चा काढण्यात आला. यात इंद्रकुमार मेघवालचा हा खटला जलदगती न्यायालयात चालवण्यात यावा, इंद्रकुमारला मारहाण करणाऱ्या जातीयवादी शिक्षकाला फाशीची शिक्षा व्हावी, भारतात या पुढे अशा घटनांना आळा बसावा यासाठी सरकारने विशेष पावले उचलावीत. इंद्रकुमारच्या परिवारास संरक्षण देऊन त्या परिवारातील एका सदस्यास सरकारी नौकरी द्यावी आदी मागण्या करण्यात आल्या.
यावेळी समाधान मैराळे, सुरेश कांबळे, पन्नालाल मावळे, सोमचंद संदानशिव, नगरसेवक शाम पाटील, विशाल जाधव, नगरसेवक बाळासाहेब संदाशिव, संतोष लोहेरे, सिद्धार्थ सोनवणे, संदीप सैंदाने, किरण बाहारे, भगवान संदाशिव, सनी गायकवाड, पठाण नूर खान, रवींद्र सोनवणे ,अजय भामरे, गौतम बिऱ्हाडे, राजा पठाण, राज बिराडे ,रिजवान शेख , डॉ. राजीव कांबळे ,सोनू सोनवणे, भूपेंद्र शिरसाठ, अनिल बेडवाल, किशोर सांगिले ,भुरा पारधी, सिद्धार्थ वाघ, राजरत्न रामराजे, दर्शन बिराडे ,सुरेश चव्हाण, विशाल ब्रम्हे, ज्ञानेश्वर ब्रम्हे, गौरव सोनवणे , राहुल बिऱ्हाडे ,सिद्धार्थ निकम ,अनिकेत बिऱ्हाडे ,जितू कढरे ,जयेश पगारे, अजय बिऱ्हाडे , सोनवणे अक्षय, राज अली, प्रवीण शिरसाठ ,विशाल बिराडे ,सागर देवरे, पृथ्वीराज नेतकर, तुषार भोई ,सुरज नेतकर यासह बहुसंख्य अमळनेरकर उपस्थित होते.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम