आजचे राशीभविष्य, बुधवार २४ ऑगस्ट २०२२

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २४ ऑगस्ट २०२२ । मेष – मनोरंजनात्मक वाचन होईल. आजचा दिवस चांगला जाईल. नवीन ओळखी लाभदायक ठरतील. तुमच्यातील उत्साह वाढेल.

वृषभ – कामे सुरळीत पार पडतील. हस्तकलेला वाव मिळेल. सामाजिक जाणीव जागृत ठेवाल. सरकारी नोकरदारांनी वरिष्ठांची मर्जी राखावी.

मिथुन – अनावश्यक खर्च कराल. दिवसाचा पूर्वार्ध चांगला जाईल. नोकरदारांना दिलासा मिळेल. अधिकाराचा योग्य वापर करता येईल.

कर्क – जोडीदाराचा सल्ला विचारात घ्या. स्व विचारात मग्न राहाल. जवळच्या व्यक्तींशी संपर्कातून चांगला मार्ग निघेल. हौस भागवण्यावर खर्च कराल.

सिंह – जोडीदाराची उत्तम साथ मिळेल. संपर्कातील लोकांशी चांगला संवाद साधला जाईल. सकारात्मकता अंगी बाणवा.

कन्या – घरातील अडकलेली कामे मार्गी लागतील. झोपेची किरकोळ तक्रार जाणवेल. दिवसाचा पूर्वार्ध अनुकूल राहील. बोलण्यावर संयम ठेवा.

तूळ – मनातील इच्छा पूर्ण होईल. अधिकाराची महत्त्वाकांक्षा वाढीस लागेल. कौटुंबिक गोष्टी समजूतदारपणे हाताळा. लबाड लोकांपासून दूर राहावे.

वृश्चिक – नवीन विचारांना चालना मिळेल. मित्रांची योग्य वेळी मदत मिळेल. कौटुंबिक वातावरण चांगले राहील. मोठ्या मनाने गोष्टींकडे पहाल.

धनू – अर्थाचा अनर्थ करू नका. आध्यात्मिक आवड वाढीस लागेल. व्यावसायिक येणी मिळतील. नवीन ओळखी होण्याची शक्यता.

आपल्या युट्युब चॅनेल ला सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/watch?v=c6l4GOOsBuM

मकर – भावंडांशी संवाद साधावा. कौटुंबिक वातावरण सकारात्मक राहील. आपले काम भले व आपण भले असे राहावे.

कुंभ – दिवसाचा उत्तरार्ध चांगला जाईल. कार्यक्षेत्रात जबाबदार्‍या वाढतील. मुलांकडून चांगल्या बातम्या मिळतील.

मीन – एखाद्या स्पर्धेत यश मिळेल. मन विचलीत होऊ शकते. उगाच त्रागा करू नका. प्रेमात संयम बाळगावा.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम