धावत्या ट्रेनमध्ये महिलेची प्रसुती…. अमळनेर स्टेशनवर गाडी थांबवून वेद्यकिय सोपस्कर करण्यात आले.

बातमी शेअर करा...

….. अमळनेर (आबिद शेख)सुरतहून बिहार जाणाऱ्या विवाहितेला अचानक प्रसूती कळा सुरू होऊन धावत्या गाडीत प्रसूती झाली लागलीच सुपरफास्ट एक्स्प्रेस थांबवून तिच्यावर वैद्यकीय सोपस्कार करण्यात आले.
२८ वर्षांची क्रांतीदेवी आठ महिन्यांची गर्भवती होती. सुरतेहून बरौनी सुपरफास्ट रेल्वेने आपल्या तीन मुलींसोबत बिहार जात असताना शिंदखेडा अमळनेर दरम्यान तिला प्रसूतिकळा जाणवू लागल्याने ती अस्वस्थ झाली. ही रेल्वे अमळनेर स्थानकावर थांबत नाही. जळगाव किंवा भुसावळ जाईपर्यंत खूप उशीर होणार होता. महिलेसोबत कोणीही पुरुष नव्हते फक्त तिच्या तीन मुली सोबत होत्या. अमळनेर स्टेशनवरून गाडी पास होत असतानाच महिलेची मुदतपूर्व डब्यातच प्रसूती झाली. तातडीने रेल्वे गार्ड ,आरपीएफ यांच्या मदतीने सुपरफास्ट रेल्वे अमळनेर स्थानकावर थांबवण्यात आली. स्टेशन मास्तर गणेश पाटील यांनी डॉ किरण बडगुजर , बालरोग तज्ञ डॉ शरद बाविस्कर याना रेल्वे स्थानकावर बोलावण्यात आले. डॉ बाविस्कर यांनी महिलेची नाळ कापली. प्लॅसेंटा बाहेर काढला. महिला व बाळाची तपासणी करण्यात आली. कर्मचाऱ्यांच्या मदतीने तिला ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले. आई व बाळाची प्रकृती उत्तम आहे. या कामी वरिष्ठ फार्मसिष्ठ किरण शिंदे , ड्रेसर रजनिशकुमार , आरपीएफ निरीक्षक कुमार श्रीकेश , जयपाल सिंग , दिनेश मांडळकर ,कर्मचारी रउफ ,अन्वर ,हेल्थ युनिट टीम यांचे सहकार्य लाभले.

BJP add
बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम