मधुमेहापासून धोका टाळण्यासाठी ‘या’ टिप्स जाणून घ्या

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १४ नोव्हेबर २०२२ काही लोकांना कमी वयात मधूमेहाचा त्रास होतो आणि तो आयुष्यभर सोबतीला असतोच त्यावर सुटका नसते असे मानले जात. आपण जर आपल्या जीवनशैलीतील बदल, तुमची झोप, तुमचा आहार या सगळ्यांचा देखील प्रभाव तुमच्या आरोग्यावर होत असतो. ब्लड शुगर लेवल वाढण्याची काही कारणे अनेकांना माहिती नाहीत. भविष्यातील तुम्हाला उद्भवणारा धोका टाळण्यासाठी तुम्ही वेळीच ही कारणं जाणून सावध व्हावे.

मधुमेह हा एक सामान्य चयापचय विकार आहे जो तेव्हा होतो जेव्हा तुमचे शरीर पुरेसे इंसुलिन तयार करू शकत नाही किंवा ते कार्यक्षमतेने वापरू शकत नाही. साखरेच्या वाढीवर नियंत्रण ठेवण्यासाठी जीवनशैलीत निरोगी बदल करण्याचा सल्ला दिला जातो कारण ते तुमची ऊर्जा पातळी आणि मूड सुधारण्यास मदत करतात.

1. अति सूर्यप्रकाश किंवा उष्णतेचा संपर्क
सनबर्नमुळे रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते. रूग्णाला अतिघामामुळे मूत्रपिंड अधिक पाणी धरून ठेवते. त्यामुळे इन्सुलिनची संवेदनशिलता कमी होते. सनबर्नच्या अस्वस्थतेमुळे तणाव निर्माण होण्याची शक्यता असते आणि तणावामुळेही रक्तातील साखरेची पातळी वाढते.

2. कॉफी आणि बाजारातील गोड पदार्थ
कॉफी आणि बाजारातील गोड पदार्थांमुळे तुमच्या रक्तातील साखरेची पातळी वाढते. तुम्ही साखरेशिवाय कॉफी घेतली तरीही, कॅफीन काही लोकांच्या शरीरात स्वतःहून साखर तयार करण्यास प्रवृत्त करू शकते.

3. झोपण्याच्या अनियमित पद्धती
एका रात्रीची अपुरी झोप देखील तुमचे शरीरातील इन्सुलिनची पातळी कमी करू शकते. झोपेच्या कमतरतेमुळे लेप्टिनची पातळी वाढते, हा हार्मोनमुळे आपल्याला भूक असतानाही पोट भरल्यासारखे वाटते.

4. नाश्ता टाळणे
मधूमेहाच्या रूग्णांना वेळेवर जेवण व नाश्ता घेणे फार महत्वाचे असते. तुम्ही अवेळी सकाळचा नाश्ता केल्यास रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहाणे कठीण ठरते.

5. हॉर्मोनल इंबॅलेंस
तुम्हाला मधूमेहाचा त्रास असो किंवा नसो पहाटेच्या वेळी तुमचे हॉर्मोन्स असंतुलित होऊ शकतात. त्यामुळे रक्तातील पातळीत वाढ होऊ शकते.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम