ऐन नवरात्रोत्सवापूर्वीच “या” निर्णयामुळे अंबाबाई देवस्थान वादाच्या भोवऱ्यात

advt office
बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २० सप्टेंबर २०२२ । ऐन नवरात्रोत्सवाच्या आगमनापूर्वीच अंबाबाई देवस्थान हे एका निर्णयामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडले असून, अनेक हिंदुत्ववादी संघटना या निर्णयाचा पुरेपूर विरोध करत आहे.

हा निर्णय म्हणजे नवरात्रोत्सवाच्या काळात देवी अंबाबाईचे सशुल्क दर्शन होय. या निर्णयानुसार, प्रति नागरिक २०० रुपयांप्रमाणे तासाला १००० भाविकांना दर्शन देण्यात येणार आहे. परंतु देवीच्या दारी भक्तीचा बाजार होऊन गरीब श्रीमंत असा भेद होऊ नये, म्हणून कित्येक हिंदुत्ववादी संघटना रोष व्यक्त करत आहे.

संघटनांनी आंदोलनाचा इशारा देत निर्णयावर पुनर्विचार करण्याची मागणी केली असता, जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी हा निर्णय भक्तांच्या सोयीसाठी घेतला असल्याच्या दाव्यावर ठाम आहेत.

दरम्यान, भक्तगणही देवस्थान समितीच्या या निर्णयामुळे निराश झाले आहेत. कारण तासनतास दर्शनासाठी रांगेत उभे राहून जर इतर चटकन सशुल्क दर्शन करतील, तर हे अत्यंत चुकीचे आहे, असे त्यांचे म्हणणे आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम