हिरापूर येथे आ.अनिल पाटलांच्या हस्ते 1 कोटींच्या पाणीपुरवठा योजनेचे भूमीपूजन.. -श्री कृष्ण मंदिराच्या सभामंडपाचे झाले उद्घाटन..
अमळनेर(आबिदशेख)विधानसभा मतदारसंघातील हिरापूर ता.पारोळा येथे आ.अनिल पाटील यांच्या प्रयत्नाने श्रीकृष्ण मंदिराच्या सभामंडपाचे काम पूर्णत्वास आल्याने याचे उद्घाटन आ.पाटील यांच्या हस्ते अतिशय थाटात करण्यात आले.
विशेष म्हणजे आमदारांच्याच प्रयत्नाने जलजीवन मिशन अंतर्गत गावासाठी नवीन पाणीपुरवठा योजना मंजूर झाल्याने या योजनेचेही भूमिपूजन यावेळी करण्यात आले.आमदारांचे गावात आगमन होताच जल्लोषात मिरवणूक काढून स्वागत करण्यात आले,त्यानंतर श्रीकृष्ण मंदिर परिसरात भव्य सत्कार सोहळा पार पडला.सदर मंदिरात भव्य सभामंडप निर्माण झाल्याने विविध धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमांना हे सभागृह उपयोगी ठरणार आहे,यावेळी आमदारांनी मनोगत व्यक्त करताना आज आपल्या मतदारसंघात जवळपास 90 गावांमध्ये जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजना मंजूर झाल्या असून यातील बऱ्याच गावांचे काम प्रगती पथावर आहे,सदर योजनांमुळे अनेक गावे टंचाईमुक्त होतील अशी भावना त्यांनी व्यक्त केली व मतदारसंघात विकासकामांसोबत कर्जमाफी असो किंवा पीक विमा असो किंवा नुकसान भरपाई असो साऱ्या गोष्टीत निधी मिळण्यात आपला मतदारसंघ अव्वल असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.
या प्रसंगी जि.प.सदस्य हिम्मत वामन पाटील, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष व्यापार उद्योग आघाडी मनोराज पाटील, लालचंद नाना, रामकृष्ण पाटील, शेळावे सरपंच अमोल पाटील, अंकुश भागवत पाटील, नंदलाल पाटील, हिरापूर चे सरपंच मंगलाताई पाटील, सुशिलाबाई महानुभव, उपसरपंच सुरेश पाटील, खालील सर्व ग्रा.पं.सदस्य घनश्याम पाटील, वाल्मीक पाटील, मोतीलाल पाटील, नाना भिल, विशाल भील, विकासो चेअरमन जगन्नाथ पाटील, विकासो संचालक योगेश पाटील, विश्वास पाटील, पुंजू महाराज, वामन पाटील, गोविंद पाटील, कल्याण पाटील, गुलाब पाटील, दिनकर पाटील यांच्या सह विजय पाटील, चंद्रशेखर पाटील, अशोक पाटील, जितेंद्र पाटील, वासुदेव पाटील, दत्तात्रय पाटील, लाला पाटील, स्कूल कमिटी चेअरमन चंद्रकांत पाटील व ग्रामस्थ मंडळ उपस्थित होते.
दरम्यान यावेळी 2515 अंतर्गत स्मशानभूमी बांधकाम करणे रक्कम रु.7 लक्ष, डी.पी.डी.सी. अंतर्गत- मराठी शाळेला वॉल कंपाऊंड बांधणे रक्कम रु.10 लक्ष.तसेच 2515 अंतर्गत सभामंडप बांधकाम रक्कम रु.15 लक्ष.आदी कामांचेही भूमिपूजन यावेळी करण्यात आले.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम