सोमवारी श्री मंगळग्रह जन्मोत्सवा निमित्त कार्यक्रम

बातमी शेअर करा...
BJP add

अमळनेर (आबिद शेख)

येथील श्री मंगळदेव ग्रह मंदिरात दर वर्षी तिथी प्रमाणे भाद्रपद शुद्ध दशमीला श्री मंगळदेव ग्रहाचा जन्मोत्सव साजरा होतो . इंग्रजी तारखेप्रमाणे ५ सप्टेंबर रोजी श्री मंगळ जन्मोत्सव पारंपारिक पद्धतीने साजरा होणार आहे . हा जन्मोत्सव म्हणजे मंदिराचा वर्षभरातील सर्वात मोठा व परम पवित्र दिवस मानला जातो. यानिमित्ताने मंदिर व परिसराला पाने फुले व रांगोळ्यांनी सजविले जाईल. सर्वत्र रोषणाई केली जाईल. मंदिरात पहाटे पाचला विशेष पंचामृत अभिषेक होईल. देवाला ५६ भोग अर्पण केले जातील. जन्मोत्सव सकाळी साडेसहा वाजता होईल .या दिवशी मंदिरातील सर्व ध्वज विधिवतरीत्या बदलले जातील. दुपारी दोन वाजता महाभोमयागास प्रारंभ होईल .सायंकाळी सहा वाजता महाआरती होईल .भाविकांनी सकाळी साडेसात ते रात्री नऊ वाजेपर्यंत येऊन तीर्थ प्रसादाचा लाभ घ्यावा ,असे आवाहन मंगळग्रह सेवा संस्थेच्या विश्वस्त मंडळाने केले आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम