भुयारी गटारीच्या कामास कोणत्याही परिस्थितीत मुदतवाढ देऊ नका-आ.अनिल पाटील.. -नागरिकांचा त्रास वाढल्याने भुयारी गटारीचे काम मार्चपर्यंत पूर्ण करण्याच्या बैठकीत सूचना..

बातमी शेअर करा...

अमळनेर-भुयारी गटारीच्या कामाचा शहरात त्रास वाढल्याने नागरिक प्रचंड वैतागले असून यापूढे कोणत्याही परिस्थितीत ठेकेदारास मुदतवाढ न देता येत्या 31 मार्च पर्यंत पूर्ण करा अश्या सक्त सूचना आमदार अनिल भाईदास पाटील यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत केल्या.
शहरात भुयारी गटारीचे काम लांबतच असल्याने काही भागात त्रास प्रचंड वाढला आहे,हे काम पूर्ण होत नसल्याने रस्ता दुरुस्तीचे कामालाही उशीर होत आहे,शहरात तर पावसामुळे मुख्य रस्त्यांची स्थिती वाईट असून पिंपळे रस्त्यावर आउटलेट चोकअप होऊन पाणी चेंबर मधून रस्त्यावर येत असल्याने डेंग्यू सारख्या आजारांना आमंत्रण मिळू लागले आहे,ही सर्व परिस्थिती लक्षात घेता आमदार अनिल भाईदास पाटील यांनी दि 29 रोजी आमदार कार्यालय अमळनेर येथे भुयारी गटार कामाबाबत आढावा बैठक घेतली,सदर बैठकीस आमदारांसह मजीप्रा चे उपविभागीय अभियंता एस. एन. वानखडे,न प अभियंता सत्यम पाटील, के. डी. झाडे, (सहा अभि श्रेणी-2 म जी प्रा उपविभाग चोपडा),ठेकेदार प्रतिनिधी किरण पाटील,कनिष्ठ अभियंता एस. एम. चौधरी, कनिष्ट अभियंता,ठेकेदार प्रतिनिधी एस. डी पाटील, स्वप्नील पाटील उपस्थित होते,यावेळी सदर योजनेच्या कामास मुदतवाढ दि 31 मार्च 2023 पर्यंत प्रस्तावित केल्याचे उपविभागीय अभियंता एस. एन. वानखडे यांनी सांगितले, त्यावर आमदारांनी 31 मार्चनंतर मुदतवाढ देण्यास येऊ नये तसेच मुदतवाढ देण्याची आवश्यकता भासल्यास दंडात्मक मुदतवाढ देण्यात यावी अशी सुचना दिली.तसेच गावातील सिवेज पाईप लाईन मध्ये बचत होत असल्यामुळे मुख्याधिकारी नगरपरिषद अमळनेर यांनी ज्या आवश्यक भागात सिवेज पाईप लाईन टाकावयाची असल्यास तसा ठराव उपलब्ध करुन देण्या बाबत सुचना आमदारांनी दिल्या.कंत्राटदाराचे प्रतिनिधी एस. डी पाटील यांनी सदर योजनेच्या कामातील अडचणी मांडल्या असता खालील प्रमाणे सुचना देण्यात आल्या यात सानेनगर येथिल सिवेज पाईप लाईन टाकण्या बाबत अडचण असल्याचे सांगीतले असता त्यावर आमदारांनी तात्काळ कार्यवाही करुन सिवेज पाईप लाईन करिता जागा उपलब्ध करुन देण्या बाबत तसेच जागा उपलब्ध होत नसल्यास सिवेज पाईप लाईन वळविता येणं शक्य आहे काय याची पडताळणी करुन सदर काम तात्काळ मार्गी लावण्या बाबत नप अभियंता सत्यम पाटील यांना सुचना दिल्या तसेच रेल्वेक्रांसिंग बाबत अडचण मांडली असता आमदारांनी अमळनेर नगरपालीका कडुन आवश्यक दस्तऐवज तयार करुन कंत्राटदाराने त्वरीत पाठपुरावा करुन काम लवकर पूर्ण करण्या बाबत सुचना दिल्या. कंत्राटदारास सदर योजनेचे काम लवकर पूर्ण करण्याकरिता माहे सप्टेंबर 2022 ते मार्च 2023 पर्यंत काम पुर्ण करण्याचे नियोजन करुन तसा योजनेच्या कामाचा बार चॉर्ट सादर करण्या बाबत सुचना दिल्या,नप अभियंता सत्यम पाटील यांना कंत्राटदाराचे मुद्ये बाबत केलेल्या कार्यवाहीचा अहवाल 8 दिवसात सादर करण्यास सांगीतले.
दरम्यान बैठकीत आमदारांनी घेतलेली कठोर भूमिका लक्षात घेता ठेकेदारास आता कोणत्याही परिस्थितीत मुदतवाढ मिळणार नाही हे स्पष्ट झाले असून मार्च पर्यंत ठेकेदारास काम पूर्ण करावयाचे असल्याने कामाचा वेग आता वाढवावा लागणार आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम