
बकालेंची अटक अटळ; पोलीस तीन दिवसांपासून मागावर
दै. बातमीदार । २९ सप्टेंबर २०२२ । मराठा समाजाबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याच्या गुन्ह्यात स्थानिक गुन्हे शाखेचे निलंबित पोलीस निरीक्षक किरणकुमार बकालेंची अटक अटळ असल्याने त्यांच्या अटकेसाठी जिल्हापेठ पोलिसांचे एक पथक ठाणे येथे रवाना झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, न्यायालयाने बकालेंचा अटकपूर्व जामीन फेटाळून लावल्यानंतर एका सहायक निरीक्षकासह तीन कर्मचारी, असे एकूण चार जणांचे पोलीस पथक किरणकुमार बकालेंच्या मागे आहे. पोलिसांनी बकालेच्या पत्नीस नोटीस दिली. परंतु त्यांनी नोटीस घेण्यास नकार दिला. यापूर्वीही दोन वेळा बकाले निवासस्थानी आढळले नाही.
दरम्यान, जामीन फेटाळल्यानंतर परत एकदा पोलीस पथक मार्गस्थ झाले असून, गेली तीन दिवस पथक ठाण्यातच आहे. याप्रकरणी बकालेंच्या कार्यालयातील सहायक फौजदार अशोक महाजन यांनाही नोटीस बजावण्यात आली असून, चौकशीच्या कामासाठी महाजन यांना हजर राहण्यास सांगितले असता, याबाबतचा खुलासा महाजन यांनी पाठवला आहे.
या वक्तव्याशी संबंधित कथित बकाले-महाजन ऑडिओ क्लिपवरून केलेल्या चौकशीत आतापर्यंत एलसीबीच्या ४० कर्मचाऱ्यांचे जवाब नोंदले गेले आहेत. तसेच याच आठवड्यात सहायक पोलीस अधीक्षक कुमार चिंथा चौकशी पूर्ण करून विशेष पोलीस महानिरीक्षक अहवाल सादर करतील.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम