अमिताभ यांनी मागितली विनोद खन्ना यांची मागितली माफी

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २१ ऑक्टोबर २०२२ ।  यंदाचा ‘कौन बनेगा करोडपती’ चा १४ वा सिझन जोरदार चर्चेत आहे. तो म्हणजे अमिताभ यांनी जुन्या आठवणीना दिलेल्या उजेळामुळे.अमिताभ बच्चन होस्ट करत आहेत. सिझन आहे. बिग बी हॉट सीटवर बसणाऱ्या स्पर्धकांना ना केवळ प्रश्न विचारतात, तर अनेकदा वेगळ्या गप्पा देखील इथं रंगताना दिसतात.

अमिताभ यांच्यासमोर सूरज दास बसले होते,त्यांनी ४४ वर्षापूर्वी रिलीज झालेल्या ‘मुकद्दर का सिकंदर’ सिनेमाशी संबंधित असा प्रश्न विचारला,ज्यानंतर अमिताभना चक्क माफी मागावी लागली. त्यांनी ही माफी दिवंगत अभिनेते विनोद खन्ना यांच्याशी मागितली. सूरज दास यांनी अमिताभ बच्चनना विचारले की, त्यांनी कुठेतरी वाचलं होतं की ‘मुकद्दर का सिकंदर’ या सिनेमाच्या शूटिंग दरम्यान अमिताभ यांनी विनोद खन्ना यांच्यावर ग्लास फेकून मारला होता,ज्यामुळे त्यांना जखम होऊन १६ टाके देखील पडले होते. सूरज यांनी बिग बी ना विचारले की, ‘हे मी योग्य बोलत आहे का?’ यावर अमिताभ म्हणाले, ”होय सर,तुम्ही अगदी योग्य बोलत आहात. माझ्याकडून ती चूक झाली होती. बारमध्ये उभे राहून आमचं मद्यपान सुरु होतं…” बिग बी आपलं वाक्य पूर्ण करत नाहीत तोवर सूरज म्हणाले,’हो,हो..हेच बोलायचं होतं मला’.
यानंतर अमिताभ बच्चन पुढे म्हणतात की, ”अरे तुम्हाला इतकं सगळं माहितीय तर उगाचच सगळ्यांसमोर कशाला बोलताय मला”. बिगी बी यांचा हा अंदाज तिथं बसलेल्या प्रेक्षकांना भलताच भावला. त्यांनतर बिग बी यांना आणखी एक प्रश्न सूरज विचारतात. सूरज विचारतात की, ‘मुकद्दर का सिकंदर च्या वेळेस तुम्हाला एका सीनमध्ये बाईक चालवायची होती. तेव्हा तुम्ही रिहर्सल करण्यासाठी जुहू ते बान्द्रा रोज बाईक चालवण्याची प्रॅक्टिस करायचात. तेव्हा खूप महिला तुमचा पाठलाग करायच्या’. हे ऐकून दोन मिनिटं अमिताभना काय बोलावे सुचेना. ते विनोदानं म्हणाले,’ हे कोणी सांगितलं तुम्हाला?’ तेव्हा सूरज म्हणाले,’त्यांनी हे गूगलवर वाचलं’. इतकंच नाही तर सूरज पुढे म्हणाले,’आजही महिला तुमचा पाठलाग करतात’. हे ऐकल्यावर बिग बी यांनी लगेच मागे पाहिलं आणि जोरजोरात हसायला लागले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम