काय सांगता! संजय दत्त दिसणार साऊथ सिनेमांत

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २१ ऑक्टोबर २०२२ । बॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता संजय दत्त याचं अख्खं घराणं बॉलीवूडशी जोडलेलं आहे. त्यामुळे अर्थातच बॉलीवूडशी त्याचा जिव्हाळा असणार हे १०० टक्के. पण असं असताना अचानक अभिनेता म्हणू लागलाय, साऊथमध्येच त्याला आता काम करायचं आहे..अन् बॉलीवूडनं साऊथ सिनेमाकडनं बरंच शिकायला हवं..नेमकं काय बोललाय संजय दत्त, काय आहे त्याचा निर्णय?

संजय दत्त गेल्या काही दिवसांपासून साऊथ सिनेमांत काम करतोय. ‘केजीएफ चॅप्टर 2’ मधून कन्नड इंडस्ट्रीत पदार्पण केल्यानंतर आता संजय दत्त ‘थलापति ६७’ या सिनेमातून तामिळ इंडस्ट्रीत एन्ट्री करत आहे. तर संजय दत्तचा दुसरा कन्नड सिनेमा ‘केडी द डेविल’ रिलीजसाठी तयार आहे. आता काही दिवसांपूर्वीच या सिनेमाचं हिंदी टायटल रिलीज करण्यात आलं. या कार्यक्रमात संजय दत्तनं आता तो साऊथ सिनेमांतच काम करण्यास इच्छुक आहे असं स्पष्ट म्हटलं आहे. इतकंच नाही तर त्याने सांगितले की,”बॉलीवूडला खरंतर आता दाक्षिणात्य सिनेमांकडून बरंच काही शिकायची ही वेळ आहे. बॉलीवूड आपल्या मुळापासून दूर भरकटत चाललेलं आहे”.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम