मागील २४ तासात सरासरी ८.३ मि.मी. पाऊस

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २३ जुलै २०२२ । वाशिम जिल्ह्यात २३ जुलै रोजी सकाळी ९.२७ वाजतापर्यंत मागील २४ तासात सरासरी ८.३ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. ०१ जून २०२२ पासून जिल्ह्यात आजपर्यंत एकुण ४३९.४ मिलीमीटर पाऊस झाला आहे.

आज २३ जुलै रोजी सकाळी गेल्या २४ तासात पडलेला पाऊस तालुकानिहाय पुढील प्रमाणे आहे. कंसात दिलेली पाऊसाची आकडेवारी ही यावर्षीच्या ०१ जून २०२२ पासूनची आहे.वाशिम तालुका – ५.१ मिमी,( ४३१.७ ),रिसोड तालुका – १.४ मिमी (४५२.२), मालेगाव तालुका – ३.० मिमी (४५५.६), मंगरूळपीर तालुका – १२.१ मिमी (४५८.३), मानोरा तालुका -१८.८ मिमी (४९५.९) आणि कारंजा तालुका – १३.२ (३५९.७) मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.मागील वर्षी २३ जुलैपर्यंत जिल्ह्यात ५०६ मिमि पाऊस पडल्याची नोंद आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम