धारूरकर परिवाराच्या दातृत्वातून महाराष्ट्र गवळी समाज बांधवांची तिरुपती बालाजी दर्शन यात्रा यशस्वी

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २३ जुलै २०२२ । वीरशैव लिंगायत गवळी समाज बांधवांची आंध्र प्रदेश व तेलंगणा राज्यातील तिरुपती बालाजी, पद्मावती व बिर्ला मंदिर तसेच परमपूज्य बालब्रम्हचारी सिदाजीआप्पा देवर्षी मठातील दर्शनाने यात्रा यशस्वीरित्या पूर्ण झाली. हैदराबाद येथील मूळ रहिवासी गुंडाप्पा धारूरकर आणि परिवाराने केलेल्या संकल्पनुसार तिरुपती बालाजी दर्शनासाठी महाराष्ट्र ,आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि तेलंगणा येथील सर्व स्तरातील गवळी समाज बांधवांना एकत्रित करून धारूरकर आणि परिवारातर्फे राज्यातील विविध जिल्ह्यातून गवळी समाज बांधवांचे तिरुपती बालाजी दर्शन यात्रेसाठी नियोजन करण्यात आले.

धारूरकर परिवाराच्या दातृत्वातून महाराष्ट्रातील गवळी समाज बांधवांना भगवान तिरुपती बालाजी दर्शन होऊ शकले.तीर्थयात्रा दरम्यान निवास व्यवस्था, भोजन व्यवस्था, प्रवास, मंदिरातील दर्शन या सर्व बाबींचे भाविकांसाठी काटेकोरपणे नियोजन हे या यात्रेचे वैशिष्ट्य ठरले.गुंडाप्पा धारूरकर आणि संतोष धारूरकर हैद्राबाद यांच्या सुयोग्य नियोजनामुळेच श्रावण महिन्यापूर्वीच गवळी समाज बांधवांना तीर्थयात्रेचा लाभ मिळाला.

 

वीजवापराच्या प्रत्येक युनिटचे बिलिंग झालेच पाहिजे; मीटर रीडिंगमध्ये हयगय झाल्यास कारवाई निश्चित

यात्रेसाठी नंदुरबार गवळी समाजाचे जिल्हा कार्याध्यक्ष तथा नंद गवळी राजाचे संपादक महादू विठ्ठलराव हिरणवाळे,मनमाड येथील महाराष्ट्र गवळी समाज संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष वसंत नामागवळी, राजेंद्र नामागवळी, माजी नगरसेवक सुनील नामागवळी, चाळीसगाव येथील अखिल भारतीय गवळी समाज संघटनेचे माजी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तुकाराम लगडे, विजय लगडे, गणेश चिपडे, मधु मिसाळ, धुळे येथील राजेंद्र गेणाप्पा, आनंदा जोमीवाळे, अनिल गवळी, नंदू नागापुरे, आनंदा गवळी, वीरेंद्र गवळी, धर्मराज बढागे, शिरपूर येथून संतोष उदीकर, नरसू उदीकर, शिवम उदीकर सोलापूर येथील बाळासाहेब आकुसखाने, गवळी समाज नागरी पतसंस्थेचे चेअरमन अनिल नायकू, दत्तात्रय नायकू, सेवानिवृत्त सनदी अधिकारी सुरेश शहापूरकर,सुरेश कलागते, संतोष कलागते,प्रदिप कलागते, संजय जानगवळी, बाळू साठे, अहमदनगर येथील मारूती कलागते, सागर चवंडके,पुणे येथील खंडू बाहीरवाडे धाराशिव येथील भालचंद्र हुच्चे यांच्यासह महाराष्ट्र,आंध्र प्रदेश आणि कर्नाटक व तेलंगणा राज्यातील गवळी समाज बांधव भाविक सहभागी झाले होते.या संपूर्ण तिरुपती बालाजी दर्शन यात्रेचे यशस्वी आयोजन हैदराबाद येथील गुंडाप्पा धारूरकर, राहुल धारूरकर, श्रीलक्ष्मी धारूरकर, गोविंदा धारूरकर यांनी सहकार्य केले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम