पक्षचिन्हाबाबत महत्त्वाचा निर्णय; शिंदे गट ‘बाळासाहेबांची शिवसेना’ तर ठाकरे गटाला मिळाले ‘हे’ नाव!

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १० ऑक्टोबर २०२२ । महाराष्ट्र राज्याच्या राजकारणात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या विषयावर आज अखेर निवडणूक आयोगाने निर्णय दिला आहे. उद्धव ठाकरे गट आणि एकनाथ शिंदे गट अशा दोन्ही गटांनी निवडणूक आयोगाकडे नव्या नावांचे आणि चिन्हाचे पर्याय दिले होते. त्यापैकी, उद्धव ठाकरेंच्या गटाला “शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)” असे नाव देण्यात आले असून एकनाथ शिंदे यांच्या गटाला “बाळासाहेबांची शिवसेना” हे नाव मिळाले आहे.

तसेच, उद्धव ठाकरे गटाला ‘मशाल’ हे निवडणूक चिन्ह देण्यात आले आहे. शिंदे गटाने दावा केलेल्या तीनही पक्षचिन्हांवर निवडणूक आयोगाने नकारघंटा दिली. त्यांनी आता उद्या दुपारपर्यंत, नव्याने ३ चिन्हांचा पर्याय देण्यास सांगितले आहे.

निवडणूक आयोगाकडे प्रतिक्षेत असलेल्या एका महत्त्वाच्या मुद्द्यावर शनिवारी निर्णय घेण्यात आला. अंधेरीच्या पोटनिवडणुकीसाठी, ठाकरे किंवा शिंदे यांच्यापैकी कोणत्याही गटाला शिवसेनेचे धनुष्यबाण हे चिन्ह वापरता येणार नसून असे राष्ट्रीय निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना हा एक मोठा धक्का मानला जात होता. शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह हे केंद्रीय निवडणूक आयोगाने तात्पुरत्या स्वरुपात गोठवले. शिवसेना हे नावदेखील सध्या उद्धव ठाकरे किंवा एकनाथ शिंदे या दोन्ही गटांपैकी कोणालाही वापरता येणार नसल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे.

 

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम