
हजरत मोहम्मद पैगंबर जयंती निमित्त गरिबांना धान्य व ब्लँकेट वाटप
बेवारस व गोरगरीब लोकांनी घेतला लाभ; आ. अनिल पाटील यांची प्रमुख उपस्थिती
अमळनेर l आबिद शेख
अमळनेर शहरातील अक्सा हॉल येथे मुस्लिम नगर सेवक शेखा हाजी यांच्या वतीने हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जन्मोत्सव निमित्त ईद ए मिलादचे पवित्र दिनानिमित्त बेवारस, गोर गरीब यांना धान्य व ब्लॅंकेट वाटप मानव सेवा तिर्थ येथे करण्यात आले.
सदर ब्लॅंकेट वाटप आमदार अनिल पाटिल यांच्या हस्ते करण्यात आले. नगर सेवक शेखा हाजी यांच्या वतीने हा उपक्रम राबण्यात आला. १०० ते १५० गरीब लोकांना धान्य व ब्लाकेट वाटप केले. यावेळी प्रमुख पाहुने म्हणून आमदार अनिल पाटिल, मुख्तार खाटीक, राजू शेख, सत्तार मास्टर, अँड रज्जाक शेख, माजी नगर सेवक सलीम टोपी, माजी नगर सेवक नरेंद्र संदाशिव, पत्रकार आबिद शेख, गुलाम नबी, आरिफ पठान, इब्राहिम पठाण, दबीर पठाण, शरीफ इंजिनियर, मोहम्मद साबीर, अफरोज खासब, मोयोद्दीन मिस्त्री, निसार शेख, रफिक शेख, कलिम मिस्री, आदि उपस्थित होते.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम