एक आमदार अन पोस्टरबाजी ; आव्हाडांनी ठाकरेंना वाढदिवशी टोमणा !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १४ जून २०२३ ।  आज राज ठाकरे यांच्या ५५व्या वाढदिवसनिमीत्ताने त्यांचे कार्यकर्ते पोस्टरबाजी, विविध कार्यक्रम, सामाजिक उपक्रम आणि केक कापून जल्लोषही करताना दिसत आहेत. यानिमीत्त राज ठाकरे यांच्या भेटीसाठी राज्यभरातून पदाधिकारी आणि कार्यकर्ते शिवतीर्थ या निवसस्थानी दाखल होत आहेत. सर्व स्तरातून राज ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या जात आहेत. यादरम्यान राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाडांनी यांनी देखील राज ठाकरेंना खोचक शब्दात शुभेच्छा दिल्या आहेत.

राज ठाकरेंचे भावी मुख्यमंत्री म्हणून सगळीकडे पोस्टर लागले आहेत. ते व्हावेत अशी मनापासून शुभेच्छा. सध्यातरी एकच आमदार आहे, अजून जवळपास पन्नास-साठ तरी वाढवावे लागतील. यासाठी त्यांनी कृतीशील कार्य करावं याच शुभेच्छा. नुसतेच टोमणे, नकला असं न करता महाराष्ट्राचा विकासाचा रोडमॅप काय आहे ते जर महाराष्ट्राला कळलं तर बरं होईल. याचा आवाज काढून, याला मी शेपटीला धरून आपटीन, त्याला मी हाताला धरून फिरवीन असे प्रकार कमी करावेत.. असे आव्हाड म्हणाले आहेत.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमीत्ताने त्यांना शुभेच्छा देण्यासाठी राज यांचे निवासस्थान असलेल्या शिवतीर्थवर मनसे कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने हजेरी लावली होती. कालपासून राज्यभरातील मनसैनिक शिवतीर्थाव गर्दी करत आहेत. राज ठाकरे यांनीदेखील निवासस्थानाबाहेर येऊन चाहत्यांच्या शुभेच्छा स्विकारल्या.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम